मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांची पवनमावळ पुर्व विभागमधील जनतेच्या समस्या आणि विविध विकास कामांबाबतीत आढावा बैठक बुधवार (दिनांक 16 ऑगस्ट) रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय पाचाणे फाटा इथे पार पडली. यावेळी 11 गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ( mla sunil shelke reviewed development works of the villages in eastern part of Pavan maval )
सांगावडे, दारुंब्रे, कुसगाव प.मा., पाचाणे, पुसाणे, चांदखेड, आढले खुर्द, आढले बुद्रुक, दिवड, ओवळे, डोणे या गावातील सरपंच, उपसरपंच यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे विकास कामाचा लेखाजोखा मांडला. आढावा बैठकीचे प्रास्ताविक पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी केले. यावेळी आमदार सुनिल शेळके यांनी स्वतः प्रत्येक गावनिहाय विकासकामांचा आढावा घेतला. तसेच येणाऱ्या काळात प्रत्येक गावाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असून आणखीन निधी उपलब्ध करून देणार आहोत, असे सांगितले. यावेळी हभप छबन महाराज कडू यांनी सर्वांचे आभार मानले.
शनिवारी (19 ऑगस्ट) शांताई इथे आढावा बैठक…
आमदार सुनिल शेळके हे शनिवारी, दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता शांताई मंगल कार्यालय काले इथे पवन मावळ मधील जनतेच्या समस्या, विविध विकास कामे आढावा बैठक घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अरे व्वाह…!! मावळ तालुक्यातील ‘या’ गावात अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण
– महागाव इथे पौष्टिक तृणधान्य पोषण मूल्य जनजागृती कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना तृणधान्य विषयी मार्गदर्शन
– सातबाऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरजच नाही! घरबसल्या ऑनलाइन करा अर्ज, जाणून घ्या