सध्या शारदीय नवरात्र उत्सव ( Shardiya Navratri 2022 ) सुरु आहे. गावोगावी मंदिरांत देवीचे घट बसले आहेत. यासह ठिकठिकाणी प्रसिद्ध आदीशक्ती, देवींच्या मंदिरात देखील घटस्थापना झाली आहे. नवरात्र उत्सवात देवींची मंदिरे असलेल्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी रांग लागलेली असते. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. ( MLA Sunil Shelke visited Ekvira Devi Temple )
हेही वाचा – शारदीय नवरात्रोत्सव : नवरात्रीचे नऊ दिवस आणि नऊ रंग, वाचा त्यांचे महत्व I Shardiya Navratri 2022
मावळ तालुका हा अनेक तीर्थक्षेत्रे आणि प्राचीन मंदिरे यांसाठी प्रसिद्ध असलेला तालुका. मावळमध्ये असलेले कार्ला येथील आदिशक्ति आई एकविरा देवीचे मंदिर हे तर सर्व महाराष्ट्रवासियांसाठी पुजनीय आणि आराध्य आहे. मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी नवरात्र उत्सवानिमित्त एकविरा देवीचे सहकाऱ्यांसोबत नुकतेच दर्शन घेतले. ‘आई एकविरा देवीची कृपादृष्टी माझ्या मावळच्या जनतेवर सदैव राहो’, अशी प्रार्थना त्यांनी देवीजवळ केली. ( MLA Sunil Shelke visited Ekvira Devi Temple at Karla )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
- वेहेरगाव – कार्ला नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गडावर आई एकविरा देवीचे मंदिर आहे
- शारदीय नवरात्र उत्सवात येथे एकविरा देवीच्या दर्शनासाठी भक्तांची अखंड गर्दी असते
- आमदार सुनिल शेळके यांनी देखील एकविरा देवीचे दर्शन घेत मनोभावे आराधना केली
- नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळेला शेळकेंनी एकविरा देवीचे दर्शन घेतले
अधिक वाचा –
आमचं ठरलंय..! खासदार बारणेंनी सांगितली मावळ लोकसभेची रणनिती; कुठल्या पक्षातून, कुठल्या चिन्हावर सर्वकाही फिक्स
Video: शिक्षण विभागाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आमदार शेळकेंचे मनोगत, सर्वांसमोर दिले ‘हे’ वचन