आमदार सुनिल शेळके यांनी सोमाटणे टोलनाक्यावर आंदोलन करण्याचा आणि टोलनाका बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. सोमाटणे टोलनाका येथे मावळातील चारचाकी वाहनांना टोल माफी असतानाही टोलचे पैसे कटत आहे. सामान्यांकडून सातत्ययाने याबाबत तक्रार होत आहे. अखेर आमदार शेळके यांनी आता स्वतः याबद्दल मैदानात उतरायचे ठरवले असून टोलनाका बंद करण्याचा इशारा दिला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांची फसवणूक करून वाहन क्रमांकाद्वारे, फास्ट टॅगद्वारे टोल आकारणी केली जात आहे. ही टोल वसुली तात्काळ बंद करावी अन्यथा 10 तारखेला टोलनाका बंद करण्याचा इशारा मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिला आहे. ( MLA Sunil Shelke Warning Regarding Somatane and Varsoli Toll Naka agitation )
“सोमाटणे व वरसोली टोलनाक्यावर स्थानिकांची फसवणूक करून वाहन क्रमांकाद्वारे, फास्ट टॅगद्वारे टोल आकारणी केली जात आहे.ही टोल वसुली तात्काळ बंद करावी अन्यथा 10 तारखेला टोलनाका बंद करण्यात येईल” – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी
– लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी मालकांचे धाबे दणाणले ! IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई
– पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election