Dainik Maval News : पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाची आढावा बैठक नुकतीच दौंड येथे पार पडली. या बैठकीत कचरेवाडी गावच्या पोलीस-पाटील मोनिका अंकुश कचरे-पाटील यांची महिला पोलीस पाटील संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. पुणे जिल्हा महिला अध्यक्ष हर्षदा संकपाळ यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी मोनिका कचरे पाटील यांच्या नावाची घोषणा केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब काळेभोर पाटील, महिला अध्यक्षा पश्चिम महाराष्ट्र तृप्ती मांडेकर, संपर्क प्रमुख अरुण केदारी, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य लक्ष्मणराव शितोळे पाटील, खजिनदार महाराष्ट्र राज्य निलकंठ थोरात पाटील, गोरक्षनाथ नवले पाटील, सोनवणे पाटील, शेंडगे पाटील, हंडाळ पाटील, करपे पाटील, संजय जाधव, अनिल पडवळ पाटील, राहुल आंबेकर पाटील, राजश्री कचरे पाटील, पुजा परचंड पाटील, दातीर पाटील, सोनाली बोडके आणि इतर महाराष्ट्र राज्यातील व पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. ( Monika Ankush Kachare has been elected as Pune District President of Mahila Police Patil Sangh )
पुणे जिल्हा पोलीस पाटील संघ आढावा बैठक दौंड तालुका येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या नेत्रुत्वामध्ये संपन्न झाली. माजी अध्यक्षा पुणे जिल्हा महिला हर्षदा संकपाळ यांचा कार्यकाळ संपल्याने नवीन महिला पुणे जिल्हा महिलाध्यक्षपदी मोनिका अंकुश कचरे पाटील यांची नूतन अध्यक्षपदी घोषणा केली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षा कचरे पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
अधिक वाचा –
– अजितदादांचे मावळात अतिभव्य स्वागत ; हे स्वागत संस्मरणीय आहे, मावळ तालुक्यासाठी 2 हजार 800 कोटींचा निधी दिला – अजित पवार
– रविंद्र भेगडे यांच्या हस्ते सोमाटणे येथे रुग्णांना फळे वाटप करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा । Ravindra Bhegade
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News