यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या “आनंदाचा शिधा” संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. “आनंदाचा शिधा” संच्याचे वाटप दि १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा मिळणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रती शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६२.५१ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. ( More than 1 crore ration card holders will get Anandacha Shidha on occasion of Gauri Ganapati festival )
अधिक वाचा –
– पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News
– महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam
– Breaking News : मुसळधार पावसाचा इशारा असल्याने सर्व शाळांना शुक्रवारी देखील सुटी जाहीर । Pune News