मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यातील विविध गावासाठी जिल्हा वार्षिक नियोजना अंतर्गत तीन कोटी रूपयांची विविध विकास कामे सुरु केली गेली आहेत. साते, कान्हे, कामशेत, टाकवे, कार्ला, मळवली, पाटण येथील गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते बुधवारी (दिनांक 17 मे) करण्यात आले. खासदार बारणे यांनी सर्वाधिक निधी मावळसाठी दिला असून विकासकामांचा धडाका सुरु आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, प्रवीण चव्हाण, सुनील मोरे, विशाल हुलावळे, दिपक हुलावळे, सागर हुलावळे, धनंजय नवघणे, गिरीष सातकर, डॅा. विकेश मुथा, दत्ता केदारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे. डी. पाटील, साते गावच्या सरपंच आरती आगळमे, कान्हे गावचे सरपंच विजय सातकर, टाकवे गावचे सरपंच राकेश डमाले, मळवली गावचे सरपंच अस्लम शेख, पाटण गावचे सरपंच प्रवीण तिकोने, कामशेतचे उपसरपंच दत्ता रावते उपस्थित होते. ( MP Shrirang Barane Completed Bhoomi pujan Of Various Development Works In Villages of Maval Taluka )
खासदार श्रीरंग बारणे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे. मावळ तालुका वाड्या वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचा अभाव आहे. अंतर्गत रस्ते नाहीत. त्याकरिता खासदार बारणे यांनी जिल्हा वार्षिक निधीतून मावळ तालुक्यात तीन कोटींचा निधी मंजूर करुन घेतला. या विकास निधीतून अंतर्गत रस्ते, समाज मंदिराच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. खासदार बारणे यांनी मावळ तालुक्याला सर्वाधिक निधी दिला आहे.
माझ्या प्रयत्नांतून मावळ तालुक्यातील विविध गावांसाठी जिल्हा वार्षीक नियोजन अंतर्गत ३ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामधील साते, कान्हे, कामशेत, टाकवे, कार्ला, मळवली, पाटण या गावातील विकास कामांचा आज भूमिपूजन समारंभ पार पाडला.
याप्रसंगी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, शरद… pic.twitter.com/OOWdGD12Va— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) May 17, 2023
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मावळातील गावांमध्ये रस्ते करण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मावळातील अनेक गावांमधील अंतर्गत रस्ते करण्यास प्राधान्य दिले. केंद्र, राज्य स्तरीय रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी आणला आहे. त्यातून गावांमध्ये रस्त्यांची कामे केली जात आहेत. गावपातळीवर राजकारणविरहित कामे केली जात आहेत. गावातील विकासांमध्ये राजकारण आणले जात नाही. सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हे बघितले जात नाही. सर्व गावांना विकासासाठी समान निधी दिला जात आहे. ग्रामपंचायतीमधील सर्वांनी राजकारणापेक्षा एकत्र येवून गावाचा विकास करण्यावर भर द्यावा. गावपतळीवर राजकारण विरहित काम करावे. त्यामुळे गावाच्या विकासाला अधिक चालना मिळेल,” असे मार्गदर्शनही त्यांनी केले.
अधिक वाचा –
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुनिल शेळकेंचे वजन वाढतंय..! आमदार शेळकेंवर पक्षाकडून पुन्हा मोठी जबाबदारी, जाणून घ्या
– मोठी बातमी! बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा बैलगाडा शर्यतींना हिरवा कंदील । Bailgada Sharyat News
– नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मोठा बदल! कायदा मंत्री किरेन रिजिजू यांची हकालपट्टी, ‘हे’ असणार नवीन कायदा मंत्री