व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 5, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल – अजित गव्हाणे यांचे आश्वासन

शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी भोसरी येथे अजित गव्हाणे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
shrirang-barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी राहील. त्यामुळे बारणे यांचे मताधिक्य दुपटीपेक्षा अधिक वाढेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी व्यक्त केला. शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी व मित्र पक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी भोसरी येथे अजित गव्हाणे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

गव्हाणे यांनी खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिवसेना व कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, विजय फुगे, सचिन आवटे, पै. अमर फुगे, राजेंद्र तरस आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व खासदार बारणे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. ( MP Shrirang Barane met NCP Pimpri Chinchwad City President Ajit Gavan )

शिवसेना-भाजप युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी झाल्याने महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना खासदार बारणे यांच्या विक्रमी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करील, असे गव्हाणे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही महायुती केली आहे. त्यामुळे राज्याच्या प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू आहे. विकासाला अधिक गती देण्यासाठी महायुतीमधील मित्र पक्षांचे सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत, ही खूप आनंदाची व समाधानाची बाब आहे, अशा भावना खासदार बारणे यांनी व्यक्त केल्या. प्रचारात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी लवकरच महायुतीतील मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याबाबतही यावेळी चर्चा झाली.

अधिक वाचा –
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट, अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश
– उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मशाल गावागावात पोहोचण्यास सुरुवात; संजोग वाघेरे-पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला चांगला प्रतिसाद
– पिंपरी विधानसभेतून खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – आमदार अण्णा बनसोडे


Previous Post

सोसायटी मेंटेनन्स न भरल्यास जप्ती कायदेशीरच, हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Next Post

‘महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ’ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-taluka-ncp

'महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ' - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

कामशेत शहरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला, आरोपी पोलिसांच्या ताब्यात । Kamshet News

August 5, 2025
Potholes have appeared again on road in themarket at Pawananagar in Maval

Pawananagar : भरलेले खड्डे पुन्हा ‘जैसे थे’, महिन्याभरात पवनानगर बाजारपेठेतील रस्त्यावर पुन्हा खड्डे ; नागरिक, पर्यटक हैराण

August 5, 2025
Pavana Dam

पवना धरण 94.17 टक्के भरले, पाऊस ओसरल्याने धरणातील विसर्ग पूर्णतः बंद । Pawana Dam Updates

August 5, 2025
garbage from Takwe Budruk Village is being thrown along road to phalane takve BK

मुख्य रस्त्यावरील कचरा हटवा अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा टाकू ; फळणेतील ग्रामस्थ आक्रमक । Maval News

August 5, 2025
Review meeting held in Lonavala Municipal Council in presence of MLA Sunil Shelke

लोणावळा नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर आमदार सुनील शेळके यांचा हल्लाबोल ! आढावा बैठकीत घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

August 5, 2025
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरातील थकीत मिळकत धारकांनी सरकारच्या ‘या’ योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता कर भरावा ; नगरपंचायत प्रशासनाचे आवाहन । Vadgaon Maval

August 4, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.