व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मशाल गावागावात पोहोचण्यास सुरुवात; संजोग वाघेरे-पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला चांगला प्रतिसाद

मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा
maval-sanjog-waghere

Photo Courtesy : fb / sanjog waghere


मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. कार्ला येथे आई एकविरा देवीचा अभिषेक करून त्यांनी मावळ विधानसभा क्षेत्रातील गावभेट दौरा सुरु केला. स्थानिक शेतकरी, कामगार यांच्या समस्यांना हात घालून वाघेरे हे प्रचाराच्या कामाला लागले आहेत, त्यामुळे त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वाघेरे यांच्या प्रचारात महाविकासआघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील हिरहिरीने सहभागी होताना दिसत आहेत. स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा वाघेरे त्यांच्या गावभेटीत बोलून दाखवत आहेत. तसेच औद्यागिकीकरण होत असताना चांगले उद्योगधंदे तालुक्यातून बाहेर गेले किंवा जात असल्याच्या मुद्द्याला हात घातल्याने कामगारांच्या भावनाही त्यांच्याप्रती पॉझिटिव्ह बनताना दिसत आहेत. ( Shiv Sena Uddhav Thackeray Party Maval Lok Sabha Constituency Village Visit of candidate Sanjog Waghere )

मावळ तालुक्याचे राजकारण हे नात्यागोत्याचे, गावकी-भावकीचे मानले जाते. अशात संजोग वाघेरे यांच्या प्रचारात मावळ तालुक्यातील त्यांचे नातेवाईक देखील प्रचारात उतरल्याचे दिसतायेत. एकीकडे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे देखील नेते-पदाधिकारी यांच्या गाठीभेटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे संजोग वाघेरे मात्र थेट जनतेत आणि वाडीवस्तीवर जाऊन प्रचारात गुंतल्याचे दिसत आहे. ह्या आघाडीवर तरी वाघेरे पुढे गेल्याचे दिसत आहे.

‘गद्दारांना गद्दारी काय असते याचा धडा शिकविण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व कार्यकर्ते व सामान्य मतदार सज्ज झाला असून आता त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वाट पहावी लागणार आहे’, असे संजोग वाघेरे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. विभागातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, तरुणांना नोकऱ्या, कामगारांना न्याय, महिलांना स्वयंरोजगार आदी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा –
– जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News
– RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway
– खासदार श्रीरंग बारणेंचे बळ वाढले, पनवेल विधानसभा क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश । Maval Lok Sabha 2024


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी विधानसभेतून खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – आमदार अण्णा बनसोडे

Next Post

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट, अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-loksabha-pune-collector

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट, अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.