व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट, अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 5, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
maval-loksabha-pune-collector

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले. डॉ. दिवसे यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयांतर्गत ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनातील स्ट्राँग रूम, थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम, साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र, देहूरोड येथील मतदान केंद्र, सोमाटणे येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्लॉलॉजी तळेगाव दाभाडे येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

त्यांनी स्टाँगरूम व्यवस्थापन, नियोजनाबाबत आढावा घेतला. मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४x७ आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी पिंपरीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपआयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते. ( Pune Collector Dr Suhas Diwase visit to strong room in Maval Lok Sabha Constituency )

जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी येथे आयोजित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचीही पाहणी करुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नवले यांनी मावळ विधानसभा मतदार संघातील पूर्वतयारी व नियोजनाबाबत माहिती दिली. मावळ मतदार संघामध्ये एकूण ३९० मतदान केंद्र आहेत. एकूण ४५ सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येकी ६ फिरती पथके (एफएसटी) व स्थीर निरीक्षण पथके (एसएसटी), ३ व्हीएसटी व २ व्हिडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) व १ उमेदवार खर्च नोंदणी पथक अशी पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५४९ मतदान केंद्र आहेत. १०० टक्के एपिक रजिस्ट्रेशन झालेले आहे. एकूण ४८ सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ६ एफएसटी, ६ एसएसटी, २ व्हीएसटी व १ व्हीव्हीटी व एक अकाउंटिंग टीम अशा टीम कार्यान्वित करण्यात आलेली असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले. पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ इमारतीमध्ये एकूण ३९९ मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत, अशी माहिती अर्चना यादव यांनी दिली.

अधिक वाचा –
– महत्वाची बातमी! निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध । Lok Sabha 2024
– जांभूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्नेहल ओव्हाळ यांची बिनविरोध निवड । Maval News
– RMC वाहनचालकांची बेफिकीरी, देहूरोडजवळ भीषण अपघात! मावळ तालुक्यातील तलाठी सुदैवाने बचावला । Fatal Accident On Old Mumbai Pune Highway


dainik maval jahirat

Previous Post

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराची मशाल गावागावात पोहोचण्यास सुरुवात; संजोग वाघेरे-पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला चांगला प्रतिसाद

Next Post

‘उड्डाणपूल हवा पण…’ वडगावमधील केशवनगर रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vadgaon-maval-railway-bridge

'उड्डाणपूल हवा पण...' वडगावमधील केशवनगर रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.