मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे दातृत्व पुन्हा एकदा समोर आले आहे. श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काळेवाडी येथील एका गरजू कुटुंबातील तरुणाला किडनी ट्रान्सफर (किडनी प्रत्यारोपण)साठी एक लाखाची वैयक्तिक मदत केली. काळेवाडीत राहणाऱ्या अनिल पालांडे या तरुणाला एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश खासदार बारणे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांच्या हस्ते देण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
खासदार बारणे यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 16) विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. दरवर्षी वाढदिवसानिमित्त बारणे यांच्यामार्फत आरोग्य शिबिर घेतले जाते. गरजु रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. काळेवाडी येथे राहणारा अनिल याला किडनी ट्रान्सफर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येणार आहे. ही बाब युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे यांना समजली. त्यांनी तत्काळ एक लाख रुपये देण्याचे मान्य केले. खासदार बारणे यांच्या वाढदिवसादिवशी एक लाख रुपयांचा धनादेश अनिल याच्याकडे सुपूर्द केला. (MP Shrirang Barane provided financial assistance of Rs 1 lakh to youth for kidney transplant)
अनिल पालांडे या तरुणाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. किडनी ट्रान्सफरसाठी मोठा खर्च आहे. त्याला वैयक्तिक एक लाख रुपयांची मदत केली. त्याला पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही मदत मिळवून देणार आहे. – खासदार श्रीरंग बारणे
अधिक वाचा –
– मावळ तालुका खरेदी विक्री संघ निवडणूक : 19 पैकी 10 जागा बिनविरोध, 9 जागांसाठी 20 उमेदवार रिंगणात । Maval Taluka Kharedi Vikri Sangh
– पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर पुन्हा मेगाब्लॉक, ‘या’ लोकल गाड्या रद्द, पाहा वेळापत्रक । Mega Block on Pune Lonavala Railway Route
– खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी 6 जणांना वनकोठडी, मावळमधील एका आरोपीचा समावेश । Pune News