मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंगळवारी (15 नोव्हेंबर) रोजी मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील ( Western Ghat Eco sensitive Area ) क्षेत्र कमी करण्याबाबत केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या समवेत एक विशेष बैठक बोलवण्याची मागणी निवदेनाद्वारे केली. ( MP Shrirang Barne Demand Special Meeting To Reduce Environmental Sensitive Area Of Western Ghats )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यातील अनेक तालुक्यांत इको सेन्सेटिव्ह एरिया ( Eco Sensitive Area ) वाढवण्याकरीता केंद्राने राज्य सरकारला अहवाल मागवला आहे. यामध्ये मावळ, मुळशी, वेल्हा हा पुणे जिल्ह्यातील मोठा भाग आहे. तसेच मावळ लोकसभेतील कर्जत, खालापूर या तालुक्यांतील शेतकरी देखील यामुळे त्रस्त आहेत. त्यामुळे खासदार बारणे यांनी याप्रकरणी मंत्री सुधीर मुनगंटीवार ( Shrirang Barne Meet Sudhir Mungantiwar ) यांना निवेदन दिले.
अधिक वाचा –
– ‘हा मंत्री नितीन गडकरी खड्डा… हा खासदार श्रीरंग बारणे खड्डा !’ मावळ तालुक्यातील अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा
– आमदार शेळके, माऊली दाभाडे यांच्या उपस्थितीत व्यापारी आणि शेतकरी बांधवांची भात खरेदी संदर्भात संयुक्त बैठक