‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेण्यासाठी मावळ तालुक्यातील माता-भगिनींनी कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणालाही पैसे देऊ नये, कोणी अशा प्रकारे पैशाची मागणी केल्यास आपल्यापर्यंत माहिती पोचवावी, असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले होते. तसेच आमदार शेळके यांनी थेट पावसाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवून शासनाने गांभीर्याने दखल घेऊन महिला-भगिनींकडुन पैशांची मागणी करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
आमदार सुनिल शेळके यांनी पावसाळी अधिवेशनात ‘पॉईंट ऑफ इन्फोर्मेशन’ द्वारे या योजनेतील संभाव्य भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे अर्ज घेत असताना महिलांना चुकीची माहिती दिली जात आहे. योजनेतील अर्ज संपत असून एक रुपयाचा अर्ज घेण्यासाठी 100 रुपये मागितले जात आहेत. तलाठी कार्यालयात उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. त्यामुळे शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. असा प्रकार समोर आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे आमदार शेळके म्हणाले. ( Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana MLA Sunil Shelke Demand To Take Action Against Corrupt )
हेही वाचा – मोठी बातमी ! मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्या, आता अर्ज करणे झाले सोपे, वाचा सविस्तर
मंत्री शंभूराज देसाई यांनी याला उत्तर दिले. मंत्री देसाई म्हणाले, “याबाबत मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या योजनेत अर्ज भरण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी जर कोणी पैशांची मागणी केली तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी (दि. 2) एका तलाठ्याला या प्रकरणी तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या योजनेसाठी सरकारी कॅम्प लावण्याची आवश्यकता असेल तर ते लावा, असेही जिल्हा प्रशासनाला आदेश दिले असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी 1 जुलै पासून मावळ तालुक्यात अर्ज वाटप सुरू करण्यात आले आहेत.हे अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. तसेच अनेक अटी व आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल केले आहेत.
अधिक वाचा –
– शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
– सुजाता सौनिक बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, जाणून घ्या त्यांच्याबद्दल । Sujata Saunik
– वडगाव नगरपंचायतीत सफाई कर्मचारी क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval