व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 21, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुजाता सौनिक बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव, जाणून घ्या त्यांच्याबद्दल । Sujata Saunik

राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 3, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
Sujata Saunik

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमासअपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,अपर मुख्य सचिव अनूप कुमार,अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. ( sujata saunik became first woman chief secretary of maharashtra state )

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन. शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळतांना सर्व लोकप्रतिनिधी तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असेन, अशा शब्दात नव नियुक्त मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा अल्प परिचय –
सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.त्या हार्वर्ड विद्यापीठाच्या टी.एच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ 2018 मधील टेकमी फेलो आहेत. त्यांनी 2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्रोस विभागातील समस्या याविषयावर मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन करत फेलोशिप देखील पूर्ण केली आहे. टेकमी फेलो म्हणून, महाराष्ट्राच्या विमा-आधारित आरोग्य सेवा या विषयावर अभ्यास करतांना केलेल्या संशोधनातून त्यांचा शोधनिबंध देखील प्रसिद्ध झाला आहे. अलीकडेच त्याचे सार्वजनिक आरोग्याचा दृष्टीकोन असलेले‘कुंभ नाशिक-त्र्यंबकेश्वर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील झाले आहे.

tata tiago ads may 2025

त्यांनी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग (SDEED) चे अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) आणि राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक सुधारणांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. ऑक्सफर्ड पॉलिसी मॅनेजमेंटच्या अभ्यासातही त्यांचा सहभाग होता. ज्यामध्ये महिला व बाल विकास आणि शालेय शिक्षण या प्रमुख विभागांच्या कामकाजाचा सारांश त्यात मांडण्यात आला होता.त्या मुंबई विद्यापीठ आणि SNDTWU, मुंबईच्या सल्लागार समितीवरही कार्यरत आहेत. तसेच सांघिक स्तरावरत्यांनी महिला व बाल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये कंबोडिया व कोसोवोमध्ये UN च्या दोन मानवतावादी मोहिमांमध्ये काम केले आहे. राज्यशासनात विविध पदांची जबाबदारी सांभाळत असतांना त्यांनी शाश्वत आणि पारदर्शक कामकाजावर नेहमीच भर दिला आहे.

अधिक वाचा –
– इंद्रायणी नदीवरील पूल, नवीन मतदार यादी, लाडकी बहीण योजना यांबाबत रवींद्र भेगडे यांचे तहसीलदारांना निवेदन । Vadgaon Maval
– भुशी धरण परिसरातील कारवाईला तात्पुरती स्थगिती ; स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार सुनिल शेळके
– ही बातमी वाचा मगच लोणावळ्यात जा, ‘ती’ दुर्घटना झाली आणि सगळंच बदललं ! पर्यटनाचे नवीन नियम लागू, ‘इथे’ थेट ‘नो-एन्ट्री’


dainik maval ads may 2025

Previous Post

वडगाव नगरपंचायतीत सफाई कर्मचारी क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval

Next Post

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
ncp shivsena Newly elected MPs

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

9 pythons were saved from death by Wildlife Protector Maval Shivdurg Mitra snake friends Maval

मावळ तालुक्यात दहा दिवसांत विविध ठिकाणी ९ अजगर सापांना ‘वन्यजीव रक्षक मावळ’ व ‘शिवदुर्ग मित्र’च्या सर्पमित्रांकडून जीवदान । Maval

June 21, 2025
Approval to provide grant to Dindi for Ashadhi Ekadashi Vari 2025

राज्य सरकारने शब्द पाळला… आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान देण्यास मान्यता । Ashadhi Vari 2025

June 21, 2025
Kasarsai Dam

कासारसाई धरण परिसरात पावसाची संततधार सुरू ; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला । Kasarsai Dam

June 21, 2025
MLA Sunil Shelke complaint regarding PMRDA irregularities Review meeting held by Anna Bansode

‘पीएमआरडीए’कडून नियमबाह्यपणे पूर्णत्वाचे दाखले…आमदार शेळकेंच्या तक्रारीनंतर विधानसभा उपाध्यक्षांकडून आढावा बैठक

June 21, 2025
Sahitya Akademi Award

मराठी साहित्यातील लेखक प्रदीप कोकरे, कवी सुरेश सावंत यांना मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

June 21, 2025
Interstate criminals arrested in Lonavala house burglary investigation property worth Rs 30 lakh seized

लोणावळ्यातील घरफोडीच्या तपासात आंतरराज्यीय गुन्हेगारांस अटक; ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, ४ जण अटकेत । Lonavala Crime

June 21, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.