वडगाव मावळ : वडगाव शहराचा भविष्यातील सर्व समावेशक विकास साधण्यासाठी मनसे मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर आणि वडगाव मावळ नगरपंचायतच्या विद्यमान उपनगराध्यक्ष सायली रुपेश म्हाळसकर यांच्या संकल्पेतून वडगाव शहरात ‘माझं वडगाव माझं व्हिजन’ हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, व्यापार, कायदेविषयक, वैद्यकीय आणि अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तब्बल-40 तज्ञ मान्यवरांशी वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन थेट संवाद साधण्यात आला. ( My Vadgaon My Vision Campaign MNS sought opinions Of Experts Will Make Blueprint For Development )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहरात नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा त्याचप्रमाणे लहान मुले/मुली, तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचे दृष्टीने शहराचा विकास कसा असावा, पुढील काळातील दूरदृष्टी ठेवून काय आणि कशा सुधारणा व्हाव्यात याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
प्रामुख्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या आरोग्यविषयक सुविधा व त्या संदर्भात संबंधितांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना, त्याचप्रमाणे शहरातील अनियंत्रित पार्किंग, विस्कळीत व अशुद्ध नळ पाणीपुरवठा, दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी, एसटी बस स्थानक, पीएमपीएमएल सुविधा, सार्वजनिक शौचालयची व्यवस्था निर्माण करणे तसेच खेळाडूंसाठी क्रीडा संकुल व निवास व्यवस्था, अंगणवाडी ते पदवीत्तर अभ्यासक्रम पर्यंत शिक्षण व्यवस्था सक्षम करणे, नागरिक व शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा भाजी मंडई, वाढते शहरीकरण व सुविधा इ. विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
खरंतर नव्या विचाराचे नव शहर घडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून मनसे वरील सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अग्रेसर व आग्रही राहील, असा निश्चय यावेळी रुपेश म्हाळसकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
अधिक वाचा –
– राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या शिळींब सोसायटीच्या चेअरमनपदी ‘ढमाले’ तर व्हाईस चेअरमनपदी ‘जगताप’ बिनविरोध
– पवना धरण 30 टक्के भरले! पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, गेल्यावर्षी आजच्या तारखेला होता ‘इतका’ पाणीसाठा
– राज्यात टोमॅटोच्या दरवाढीने नागरिक हैराण, कृषि आयुक्तांकडून उपाययोजनांसाठी तातडीची बैठक