लोकसभेत ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले आहे. एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली, तर विधेयकाच्या विरोधात दोन मते पडली. चिठ्ठीद्वारे मतदान होऊन हे विधेयक मंजूर झाले आहे. मोदी सरकारचे ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ लोकसभेत मंजूर झाल्याने महिलांना आता लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. ( Narendra Modi Government Women Reservation Bill 2023 Passed In Loksabha )
नारी शक्ती वंदन विधेयकाला सर्वच पक्षांचा पाठिंबा होता. त्यामुळे विधेयक मंजूर होईल यात कुणालाही शंका नव्हती. चिठ्ठीद्वारे या विधेयकाबाबत मतदान घेण्यात आले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले असल्याने आता ते राज्यसभेत मांडले जाईल. राज्यसभेत एनडीएचे बहुमत असल्याने तिथेही विधेयक मंजूर होण्यास काही अडचण येणार नाही.
- नारी शक्ती वंदन विधेयकावर लोकसभेत चर्चा झाली, तेव्हा विधेयकाबाबत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले. महिला आरक्षण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्वप्न असल्याचं काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. दुसरीकडे, भाजपने महिला आरक्षण आंदोलनाचे श्रेय गीता बॅनर्जी आणि सुषमा स्वराज यांना दिले.
महिला आरक्षण कायदा पास झाल्यावर काय होणार?
विधेयक मंजूर झाल्याने आता लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण असेल. राज्यसभा आणि विधानपरिषदेमध्ये हे आरक्षण दिले जाणार नाही. तसेच या कायद्याचा लाभ महिलांना लगेच मिळणार नाही. 2026 नंतर नारी शक्ती वंदन कायदा लागू होईल. त्यानंतर महिलांना आरक्षण मिळण्यास सुरुवात होईल. देशातील महिलांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय असून राजकारणातील त्यांचे प्रतिनिधित्व आणि सहभाग वाढणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘मावळ तालुक्यातील गृहप्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी होणार, रहिवाशांना मूलभूत सुविधा न देणाऱ्या विकसकांवर कारवाई होणार’
– गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या सातव्या दिवशी रात्री बारापर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी मिळावी – आमदार शेळके
– ‘पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करा’, वारकरी संप्रदाय मंडळाचे तहसीलदारांना निवेदन