शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्ती पत्र शिवसेना (उबाठा) पक्षाचे पुणे जिल्हा प्रमुख अॅड गौतम चाबुकस्वार आणि मावळ विधानसभा संपर्क प्रमुख प्रभाकर पवार यांच्या सहीनिशी नरेश काळवीट यांना देण्यात आले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नरेश काळवीट यांनी यापुर्वी शिवसेनेच्या कामगार सेना, वाहतूक सेना आदी विभागांचे पदभार संभाळले आहेत. तसेच शिवसेना पक्षाचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते असा त्यांचा लोणावळा शहरात लौकीक आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एक वर्षासाठी त्यांची हि नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आणि महत्वाच्या कालावधीत नरेश काळवीट यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. ( Naresh Kalveet Appointed Deputy City Chief Of Lonavala City Shiv Sena UBT Party )
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पक्ष संघटनेत सक्रियपणे सहभागी होऊन शिवसेना उबाठा पक्षाच्या वाढीसाठी काम करण्याची जबाबदारी काळवीट यांच्यावर देण्यात आली आहे. ‘शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून लोणावळा शहरात काम करत आहोत, यापुढेही तसेच काम करत राहू आणि पक्षाच्या वाढीसाठी नव्या जबाबदारीसह स्वतःला झोकून देऊ’ असा विश्वास नरेश काळवीट यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना व्यक्त केला.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू
– मोठी बातमी! पीडीसीसी बँकेद्वारे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार
– कामशेतमध्ये श्री संत रोहिदास महाराज भवन बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी देणार, आमदार सुनिल शेळकेंची घोषणा । Kamshet News