Dainik Maval News : ज्ञानसुर्य महात्मा फुले यांंच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत काव्य मित्र संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण शाळेतील शिक्षक गणेश पाटील यांना राष्ट्रीय शिक्षक सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणेश पाटील यांना यापूर्वी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शास्त्रज्ञ डॉ. अशोक गोविंद नगरकर यांच्या हस्ते पाटील यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रविवारी (दि.1 डिसेंबर) रोजी सायन्स पार्क चिंचवड येथे हा समारंभ संपन्न झाला. बी.एस.सी., बीएड शिक्षण असलेले गणेश पाटील हे श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन जवण शाळेतील गणित विषयाचे शिक्षक असून विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. मागील 25 वर्षांपासून अविरतपणे ते ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. आजवर त्यांना मावळ पंचायत समिती 2015, रोटरी क्लब ऑफ लोणावळा 2017, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार 2019, खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ जिल्हा स्तरावरील 2022 आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था मावळ मध्ये त्यांनी अध्यक्ष व सचिव पदावर काम केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ या संघटनेच्या सचिव पदावर कार्यरत राहिलेले आहेत. सध्या येथे ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यासह तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात अनेक वर्षे परिक्षक म्हणून काम केलेले आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर श्री पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke