Dainik Maval News : जागतिक आरोग्य संघटनेने भारत 2024 पर्यंत क्षयमुक्त करण्याचे ध्येय जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार मावळ तालुक्यात कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्रात गावातील रुग्णांना लसीकरण करत मोहिमेची सुरूवात करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वाघमारे यांनी ग्रामस्थांना क्षयरोग टीबी लसीकरणाचे महत्व समजावून सांगितले. जास्तीत जास्त लोकांनी ही लस घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी डॉ दत्ता तपसे, आरोग्य सेविका सुवर्णा बंडगर, दीपिका मुकादम, सागर गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन
– कुसगाव बुद्रुक येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले राजगडाची भव्य प्रतिकृती, आमदार शेळकेंकडून कौतूक
– पीएमआरडीएकडून मावळातील रस्त्यांसाठी 123 कोटींचा निधी, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नांना यश । MP Shrirang Barne