Dainik Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) मावळ तालुक्यात आगमन झाले. तळेगाव दाभाडे येथे अभूतपूर्व स्वागतानंतर अजित पवार यांची जाहीर भव्य सभा झाली. त्यानंतर अजित पवार यांची लोणावळा येथे जन संवाद सभा झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जन सन्मान यात्रेच्या दरम्यान लोणावळ्यात संवाद सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. लोणावळ्याला निसर्गाने भरभरून संपदा दिली आहे. महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा, माथेरान यांसारख्या पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. मावळ तालुक्यात 2800 कोटी रुपयांच्या विकास कामांची पूर्तता केली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. ( NCP Ajit Pawar Jan Samman Yatra Lonavala Maval Taluka MLA Sunil Shelke )
बोरघाट ते सिंहगड इन्स्टिट्यूट समोरील काम जोमाने सुरू आहे, ज्या अंतर्गत टनेल आणि ब्रिज बांधले जात आहेत, याचा फायदा निश्चितपणे होईल. कोयना, भंडारदरा, पवना धरण येथे जल पर्यटनाचा विकास करण्याचा आमचा मानस आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.
सोबत, लोणावळ्यातील गोरगरीबांची मुले इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकतील यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. लोणावळ्यात सरकारी शाळा तसेच सेमी-इंग्रजी शाळा सुरू झाल्या पाहिजेत. लोणावळ्याच्या हिताच्या कामांसाठी स्थानिकांनी सुचवलेल्या प्रस्तावांवर विचार करून योग्य योजना आखल्या जातील, अशी ग्वाही अजित पवार यांनी उपस्थितांना दिली.
अधिक वाचा –
– चंदनवाडी शाळेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, जेके फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्यांचे वाटप । Maval News
– स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्यांचे वाटप ; किरण जगताप, साहेबराव बोडके यांचा स्तुत्य उपक्रम
– गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे वाचला 5 देशी बैल आणि एका गायीचा जीव, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना । Kamshet News