Dainik Maval News : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची अलिबाग येथे भेट घेऊन, आमदार सुनिल शेळके यांना मंत्रिपद द्यावे, अशी आग्रही मागणी केली आहे.
यावेळी शिष्ठमंडळात तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, साहेबराव कारके, संजय बावीसकर, प्रशांत भागवत, बाळासाहेब भानुसघरे उपस्थित होते. गणेश खांडगे यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकडे सुनिल शेळके यांना मंत्रिपद देण्याची आग्रही मागणी केली.
सुनिल शेळके यांना असलेला प्रचंड जनाधार आणि मिळालेले मताधिक्य, मावळ तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी नेतृत्व, राज्यातील महायुतीच्या विजयात असणारा मोलाचा वाटा, राजकारणाचा अनुभव आणि कौशल्य व युवकांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व या मुद्द्यांवर शेळके यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी केली आहे.
आमदार सुनिल शेळके यांची 2019 व 2024 मधील निवडणुकीतील सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रचंड मताधिक्य हिच त्यांच्या नेतृत्वगुणांची ओळख आहे. प्रभावी कार्यक्षमता आणि पक्षाच्या यशातील मोलाचे योगदान पाहता त्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे योग्य ठरेल, तसेच त्यांच्या सहभागामुळे सरकार अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक ठरेल, असेही खांडगे म्हणाले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke
– अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात तरुणाला 20 वर्षांची सक्तमजुरी ; वडगाव मावळ कोर्टाचा निर्णय । Maval Crime
– पराजय स्वीकारायचा असतो आणि विजय झाला तर हुरळून जायचे नसते – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade