व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळवासीयांनी दिलेले प्रेम आमदार पदापेक्षा मोठे, जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार – बापूसाहेब भेगडे । Bapu Bhegade

तळेगाव दाभाडे येथे शनिवारी (दि.30) सायंकाळी आभार दौऱ्यातील समारोप बैठक झाली, यावेळी भेगडे बोलत होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 4, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Vidhan Sabha Independent Candidate Bapusaheb Bhegde Thank You Tour in Constituency

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मला काहीही कमवायचे नाही; मला फक्त तुमच्यासारखी प्रेमाची माणसं कमवायची आहेत, आपण दिलेल्या भरभरून प्रेमामुळेच माझ्यामध्ये उर्जा संचारली आहे. त्या उर्जेने प्रेरित होऊन मावळच्या जनतेसाठी मी काम करणार आहे आणि भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे बापूसाहेब भेगडे यांनी आश्वासित केले.

सर्व मावळवासीयांनी जे प्रेम दिले ते आमदार पदापेक्षा खूप मोठे आहे. आपण समस्त बंधू भगिनींनी केलेल्या अलोट प्रेमामुळे मी अपयशच विसरुन गेलो आहे. आपले जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाच्या ऋणातून मी कदापी मुक्त होणार नाही, असेही बापूसाहेब भेगडे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत प्रचार यंत्रणेत घेतलेल्या परिश्रमाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची (दि.28, 29 आणि दि. 30 नोव्हेंबर) या तीन दिवसांचा तालुक्यातील सर्व पंचायत समिती गण व जिल्हा परिषदेच्या गटात तसेच लोणावळा, देहुरोड, देहूगाव, तळेगाव दाभाडे आदी शहरांत आभार दौऱ्यांच्या बैठका संपन्न झाल्या.

तळेगाव दाभाडे येथे शनिवारी (दि.30) सायंकाळी आभार दौऱ्यातील समारोप बैठक झाली, यावेळी भेगडे बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, गणेश काकडे, सुभाषराव जाधव, सचिन घोटकुले, माजी नगरसेवक संतोष भेगडे, आयुब सिकीलकर, अमोल शेटे, अरुण माने, निखिल भगत, प्रकाश ओसवाल, संजय वाडेकर, बाळतात्या भेगडे, ॲड. रुपाली दाभाडे, वैशाली दाभाडे, सचिन टकले, रवींद्र माने, माजी उपसभापती शांताराम कदम, संतोष मुऱ्हे, वैभव कोतुळकर, कल्पेश भगत, आशिष खांडगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

बापूसाहेब भेगडे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी अपयशाचा विचार न करता खचून जाऊ नका. पुन्हा यापुढेही जोमाने कामाला लागायचे आहे. आता रडायचे नाही तर लढायचे आहे. आम्ही सर्वजण तुमच्या सोबत असून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. महिलाभगिंनीचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार निर्मिती आणि विद्यार्थ्यांना सक्षम शिक्षण देऊन कुठल्याही अडचणीला आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. युवकांना कुठेही पार्टीसाठी तसेच महिला भगिनींना कुठेही देवदर्शनाला नेणार नाही; मात्र त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करून त्यांना आधार देण्याचे वचन भेगडे यांनी दिले.

नेत्यांच्या निवडणुका झाल्या आहेत, मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत. त्यासाठी आम्ही उतरणार असल्याचे भेगडे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबाबत सर्व मावळवासिय जनतेचे भेगडे यांनी कौतुक करत आभार मानले. यावेळी रवींद्र भेगडे, गणेश भेगडे व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळ तालुक्यातील तरुणांचे अनोखे साहस । Ajit Pawar & Sunil Shelke
– ‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी
– कोणतेही खाते दिले तरीही मी जनतेला न्याय मिळवून देईन – आमदार सुनिल शेळके । MLA Sunil Shelke


Previous Post

‘सुनिलआण्णांच्या रुपाने मावळ तालुक्याला मंत्रिपद मिळावे’, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

Next Post

पवना धरणात दोन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह शोधण्यात यश । Pavana Dam News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Two youths from Balewadi drowned in Pavana Dam Maval

पवना धरणात दोन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह शोधण्यात यश । Pavana Dam News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.