Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नव्या अध्याय सुरू करून रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे ने अभिनव उपक्रम आयोजित केला आहे, असे उद्गार डिस्टिक डायरेक्टर वसंतराव माळुंजकर यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून नगरपालिकेच्या सर्व शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या डिजिटल सक्षमीकरण रोटरी ॲपच्या वाटप प्रसंगी केले. याप्रसंगी नगरपालिका शाळेतील 75 शिक्षक उपस्थित होते या सर्वांना या ॲपचे वाटप करण्यात आले.
यावेळी डिस्टिक को डायरेक्टर संदीप मगर,माजीसह प्रांतपाल दीपक फल्ले,डायरेक्टर डॉ सौरभ मेहता,डॉ सचिन भसे हे उपस्थित होते. गोल्डन रोटरी क्लब व सी एस आर फंड त्याच्या माध्यमातून शाळांसाठी मोफत पेंट ई लर्निंग किट अल्प दरात तसेच इतर सुविधा पुरविल्या जातात. याप्रसंगी गोल्डन रोटरी चे अध्यक्ष रो संतोष परदेशी यांच्या संकल्पनेतून आयोजित “कर्तव्यनिष्ठ शिक्षिका सन्मान” सौ विजया प्रशांत सोनटक्के ( क्षीरसागर ) यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्या अत्यंत भावुक होत म्हणाल्या 30 वर्षानंतर देखील माझ्याच विद्यार्थ्यांनी माझा आगळावेगळा सत्कार केला यापेक्षा मोठे भाग्य नाही. याप्रसंगी माजी विद्यार्थी सुनील कांबळे,संतोष गुरव,सचिन मेहता व महेश भेगडे आवर्जून उपस्थित होते.
डिस्टिक को डायरेक्टर प्रो संदीप मगर यांनी ची माहिती दिली तसेच शिक्षक दिनानिमित्त गोल्डन रोटरीने दिलेली ही अनोखी भेट खरंच प्रशासनीय आहे असे मत व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापिका माळवतकर मॅडम यांनी गोल्डन रोटरीचे कायमच सहकार्य असते तर शितोळे मॅडम यांनी डिजिटल ॲप देऊन केलेल्या सहकार्यामुळे शिक्षकांना मोठी मदत होणार आहे असे मत व्यक्त केले.
गोल्डन रोटरीच्या या उपक्रमामुळे शिक्षकांचा सन्मान होऊन त्यांना डिजिटल साधनांची भेट मिळाली यामुळे नगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसप्पा भंडारी,दिनेश चिखले,दीक्षा वाईकर,चेतन पटवा, दीपाली शिंदे,महेश कुंभार,सुरेश भाऊबंदे व ललित देसले यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो प्रदीप टेकवडे यांनी तर प्रास्ताविक सुजाता देव यांनी केले,आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News