मावळ ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय सुराणा यांची, तर उपाध्यक्ष पदी सचिन गोंविद ठाकर आणि विकास वाजे यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार (दिनांक 15 फेब्रुवारी) रोजी वडगांव मावळ येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर नूतन कार्यकारिणी विषयावर चर्चाविनिमय होऊन नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यावेळी मावळते अध्यक्ष भारत काळे यांनी आपला कार्यकाळ संपल्याने ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर वरिष्ठांनी राजीनामा स्विकारल्यानंतर नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे, गणेश विनोदे, सुदेश गिरमे, सचिन शिंदे, संकेत जगताप, केदार शिरसाठ, प्रसाद कुटे, अभिषेक बोडके, उत्तम ठाकर आदी जण उपस्थितीत होते.
मावळ ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी
- अध्यक्ष – विजय सुराणा
- उपाध्यक्ष – सचिन गोंविद ठाकर आणि विकास वाजे
- सचिव – ज्ञानेश्वर ठाकर
- सहसचिव – योगेश घोडके
- कायदेशीर सल्लागार – किशोर ढोरे
- पत्रकार परिषद प्रमुख – निलेश ठाकर
- खजिनदार – सुभाष भोते
- प्रकल्प प्रमुख – चेतन वाघमारे
यांच्या निवडी माजी अध्यक्ष भारत काळे यांनी जाहीर केल्या. यावेळी अनुमोदन जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे यांनी केले.
अधिक वाचा –
– ठाकरे धनुष्यबाणाची लढाई का हरले? वाचा निवडणूक आयोगाच्या आदेशातून शिंदेंच्या विजयाची प्रमुख 5 कारणे
– “नाव, चिन्ह काढून घेतलं तरी जनतेचा आशिर्वाद कसा काढणार? देश कायद्याने चालणार की महाशक्तीच्या मर्जीने?”