महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ तालुका कार्ला-कुरवंडे जिल्हा परिषद गटातील नूतन कार्यकारणीची घोषणा करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश शंकरराव म्हाळस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच, म्हाळसकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पक्षबांधणी व पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात गावोगावी मनसे शाखा स्थापन कराव्यात यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन रुपेश म्हाळस्कर यांनी यावेळी केले. या प्रसंगी तालुका उपाध्यक्ष अनंता तिकोने आणि कोअर कमिटी सदस्य सुरेश जाधव, तानाजी तोडकर, संग्राम भानुसघरे आदी जण उपस्थित होते. ( New Executive Committee of Karla Kurwande Zilla Parishad Group 0f Maval MNS Announced By Rupesh Mhalaskar )
नवनियुक्त कार्यकारणी पुढीलप्रमाणे
कार्ला पंचायत समिती गण
- विभाग अध्यक्ष अंकुश कचरे
- उपविभाग अध्यक्ष – इक्तियार इनामदार, नाथा पिंपळे
- गट अध्यक्ष – वैभव तिकोने, दिनेश पठारे, विठ्ठल ढाकोळ, मंगेश फाटक
कुरवंडे पंचायत समिती गण
- विभाग अध्यक्ष – राजू भानुसघरे
- उपविभाग अध्यक्ष – रविंद्र खांडेभरड, नामदेव बोत्रे
- गट अध्यक्ष – अमित बोरकर
अधिक वाचा –
– मावळवासियांसाठी आनंदवार्ता : वडगाव शहरात पीएमपीएमएल बस पास सेवा केंद्र सुरू
– वडगाव फाट्यावरील सिल्वर ट्रेझर सोसायटीच्या परिसरात भीषण आग; आपदा मित्राच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अपघात