महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नूतन कार्यकारिणी मंगळवारी (दिनांक 9 मे) रोजी जाहीर करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश गोपाळ केदारी यांच्या अध्यक्षेतेखाली ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली. ( New Executive Committee of Lonavla Khandala Taxi Drivers Owners Association announced )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नूतन कार्यकारणी खालीलप्रमाणे –
लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या अध्यक्षपदी योगेश अनिल गवळी, कार्याध्यक्ष पदी हेमंत मेने, उपाध्यक्ष पदी पुष्पीन्द्र सिंग आनंद, काशिनाथ येवले आणि अमर जंगम, तर खजिनदार पदी मंगेश कदम, सेक्रेटरी पदी अजय लुंकड तर सहसेक्रेटरी पदी जावेद गनी शेख अशी नावे जाहीर करण्यात आली आहेत.
लोणावळा खंडाळा टॅक्सी चालक मालक संघटनेची नुतन कार्यकारणी ही वाहतूकदारांना न्याय व व्यवसाय मिळवून देण्यासाठी कार्य करेल, तसेच विस्तारित कार्यकारणी लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती महेश केदारी यांनी दिली.
अधिक वाचा –
– पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून आवारे कुटुंबीयांचे सांत्वन; दोषींवर कठोर कारवाईची कुटुंबीयांची मागणी । Kishor Aware Murder Case
– आनंदवार्ता! श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रेसाठी 5000 विशेष बसेस सोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Ashadhi Wari 2023