शनिवार दिनांक 30 डिसेंबर, रविवार दिनांक 31 डिसेंबर अशा सलग सुट्ट्या आणि 1 जानेवारी नवीन वर्षाची सुरुवात त्यामुळे बरचसे प्रवासी हे पर्यटन स्थळावर जात असतात. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबविण्यात येते व वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता मागील शनिवारी 24 तासामध्ये 55,868 वाहने द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनी वरून गेली तसेच मुंबई पुणे जुना महामार्ग NH 48 या वरून 21,135 वाहने गेली. सदर वाहनांना घाटामधील संयुक्तिक मार्गाचा सुद्धा वापर करावा लागतो इतक्या प्रचंड प्रमाणात वाहने आल्यानंतर घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. ( New Year 2024 Due to Consecutive holidays Possibility of traffic on Mumbai Pune Expressway )
तरी सर्व जड अवजड वाहन मालक/चालक संघटना यांना आवाहन करण्यात येते की, वर नमूद दिवशी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुणे वाहिनीवरील प्रवास दुपारी 12.00 वा. नंतर सुरू केल्यास त्यांना घाटामध्ये थांबण्याची गरज पडणार नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे सदर वाहनांचे क्लच प्लेट जाणे, इंजिन चे काम निघणे इत्यादी टळू शकेल तसेच इंधन व वेळची बचत होईल.
अधिक वाचा –
– राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंदर मावळातील पहिल्या इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
– तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ‘पाऊणे दोन कोटींची चूक’, प्रकरण हलक्यात न घेता उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी
– श्रीविठ्ठल मंदिर संस्थान तळेगांव दाभाडे यांच्या वतीने श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे आयोजन