कृषि अधिकारी, मावळ तालुका व मंडळ कृषि अधिकारी काळेकॉलनी आयोजित पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम मौजे महागाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कृषिसहाय्यक विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विध्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, राळा, राजगिरा, वरई, कुटकी, सावा, नाचणी इ. तृणधान्यांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पौष्टिक तृणधान्याचा वापर आपल्या आहारात करावा, असे आव्हान विकास गोसावी यांनी केले. मिलेट ऑफ द मंथ यासंकल्पने नुसार ऑगस्ट हा महिना राजगिरा या तृणधान्यासाठी घोषित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने राजगिऱ्याचे आहारातील महत्त्व शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावे याकरिता कृषि विभागाकडून राजगिरा लाडू वाटप करण्यात आले.
कृषि विभागामार्फत महिला शेतकऱ्यांना यावेळी मिलेट पौष्टिक बियाणे किट वाटप करण्यात आले. पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्त्व व पोषणमूल्य याविषयी तनुष्का साईनाथ कंधारे, नेहा एकनाथ भालेसईन, वेदांत शंकर सोनार, आर्या विठ्ठल कडू, कार्तिकी संदिप पडवळ, अक्षरा मुकूंद घायाळ या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे महत्व सांगितले. सदर कार्यक्रमाचे नियोजन महागाव शाळेतील शिक्षक धोंडिबा घारे, कुमूदिनी जगताप, रेखा भालेराव, कृषी सहाय्यक विकास गोसावी, सुनील गायकवाड, कृषिमित्र पांडुरंग पडवळ, भगवान सावंत यांनी केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली, ढोल-ताशाच्या गजरात स्वातंत्र्यसैनिकांची मिरवणूक, आमदार सुनिल शेळकेंची उपस्थिती । Vadgaon Maval
– हर घर तिरंगा – मेरी माटी मेरा देश – पंचप्रण शपथ । पवनानगरमधील पवना शिक्षण संकुलात देशाचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा