मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) एक दुर्दैवी घटना घडली आहे. कामशेत येथे रेल्वेच्या धडकेत एका अनोळखी वृध्द व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार (दिनांक 4 नोव्हेंबर) रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅक ओलांडताना प्रगती एक्सप्रेसची धडक बसल्याने हा अपघात झाला. ( Old man dies in train pragati express collision at kamshet )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत येथे अनोळखी वृध्द व्यक्तीचा (वय अंदाजे 65 – 70) कामशेत रेल्वे स्थानकावर लोहमार्ग ओलांडताना किलोमीटर 143 / 41-43 दरम्यान शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास प्रगती एक्सप्रेस (गाडी क्र. 12126) गाडीची जोरदार धडक बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस अनिल जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह खंडाळा प्राथमिक उपआरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
अधिक वाचा –
– ‘आमदार साहेब हे वागणं बरं नव्हं..’, माजी आमदारांचा आजी आमदारांवर निशाणा I Maval Politics
– ‘खोटे सांगाल तर रस्त्यावर उतरून विरोध करू’, भाजपाचा विरोधकांना इशारा