पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृती दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. मलघे यांनी आपल्या मनोगतात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महिलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करत असताना त्यांना अनेक सामाजिक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. सावित्रीबाई फुले यांच्या अपरिचित योगदानामुळेच आजच्या महिलांना विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. असेही ते आपल्या मनोगतात म्हणाले. इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका छाया काशिद यांनी शितल साठे लिखीत “साऊ” या कवितेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिप्ती पेठे यांनी केले. उपस्थितांमध्ये सांस्कृतिक विभागाचे मावळ तालुकाध्यक्ष भरत (नाना) राजिवडे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Commemorative greetings to Krantijyoti Savitribai Phule at Indrayani College )
अधिक वाचा –
– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा उप शहर प्रमुखपदी नरेश काळवीट यांची नियुक्ती । Lonavala News
– मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सरपंच परिषदेच्या अध्यक्षपदी धामणे गावचे सरपंच अविनाश गराडे । Maval News
– महाविकासआघाडीचा मावळ लोकसभेचा उमेदवार ठरला? पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली घटक पक्षांची समन्वय बैठक । Maval Lok Sabha