राज्यात वेगळे वारे वाहत असतानाही मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची खासदारकीची हॅटट्रिक झाली याचे सर्व श्रेय सर्वसामान्य व सूज्ञ मतदारांना जाते, असे उद्गार मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी काढले. निवडणुकीत प्रचंड मेहनत घेणारे शिवसैनिक व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा आपल्या विजयामध्ये मोठा वाटा असल्याचे बारणे यांनी यावेळी सांगितले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक केल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसैनिकांच्या वतीने फुलांनी सजवलेला मोठा धनुष्यबाण देऊन मोठ्या जल्लोषात बारणे यांना गौरविण्यात आले. खासदार बारणे व शिवसेनेच्या जयघोषात शिवसैनिकांनी )मोठ्या जल्लोषात विजयोत्सव साजरा केला. ( On behalf of Pimpri-Chinchwad Shiv Sena MP Shrirang Barane was felicitated )
- बारणे म्हणाले की, आपण गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामे, नागरिकांशी सातत्याने ठेवलेला संपर्क तसेच शिवसैनिक आणि महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेतलेली मेहनत यामुळे मतदारांनी आपल्याला सलग तिसऱ्यांदा निवडून देऊन देशातील सर्वोच्च अशा संसदेत पाठवले आहे. मतदारांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. पिंपरी-चिंचवडकरांनी मोठे मताधिक्य दिल्यामुळे आपला विजय सोपा झाला पिंपरी चिंचवड शहरातील मतदारांचे बारणे यांनी विशेष आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा एनडीए सरकार केंद्रात सत्तेवर आले आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारही चांगले काम करीत आहे. मावळ मतदारसंघात सुरू असलेली तसेच प्रस्तावित विकास कामे मार्गी लावण्यासाठी यापुढेही आपण पाठपुरावा करू आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवू, असे बारणे यांनी सांगितले.

मागील गोष्टी उगाळत बसण्याऐवजी शिवसैनिकांनी नव्या जोमाने पुन्हा कामाला लागावे. असे आवाहन बारणे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत शिवसेना नेत्रदीपक यश संपादन करून नवा इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या भाषणातून खासदार बारणे यांचे अभिनंदन केले.
अधिक वाचा –
– शाळेचा पहिला दिवस ठरला अविस्मरणीय ! पवना शिक्षण संकुलात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत । Pavananagar
– वडगाव शहरातील महिलांसाठी मोरया प्रतिष्ठानमार्फत ‘व्यवसाय प्रशिक्षण आपल्या दारी’ उपक्रम । Vadgaon Maval
– आख्ख्या तालुक्यात होतेय चर्चा ! ‘तळेगावकरांच्या सुरक्षिततेसाठी, 1 रुपयाचे दान सीईओच्या व्यसनमुक्तीसाठी’ । Talegaon Dabhade