गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोरया प्रतिष्ठानच्या वतीने भव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 22 मार्च रोजी पंचायत समिती चौक वडगाव येथून सायंकाळी 5 वाजता या शोभायात्रा मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
गुढीपाडवा उत्सव 2023 शोभायात्रा मिरवणूकीमध्ये पारंपारिक वेशभूषा, ऐतिहासिक वेशभूषा, मावळे, सरदार, अष्टप्रधान, आध्यात्मिक वेशभूषा, संतजन इत्यादी वेशभूषेत वडगाव शहरातील रहिवाशांनी सहभागी व्हावे. तसेच शोभा यात्रेमध्ये येताना पुरुषांनी पारंपारिक वेशभूषेत मंगल वेशामध्ये म्हणजेच सलवार कुडता तर महिला भगिनींनी नऊवारी साडी मध्ये येत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मयूर ढोरे आणि अबोली ढोरे यांनी नागरिकांना केले आहे.
हेही वाचा – मोरया महिला प्रतिष्ठान तर्फे घरकाम करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान
यावर्षी होणाऱ्या गुढीपाडवा शोभायात्रेत महाराष्ट्रातील विविध भागातील तब्बल 350 कलाकारांच्या उपस्थितीत विविध कला संस्कृतीचे दर्शन आणि पारंपारिक मर्दानी खेळ पहावयास मिळणार आहे. यात प्रामुख्याने प्रभू श्रीरामचंद्राचे अयोध्येतील मंदिर प्रतिकृती, महाराष्ट्राची लोकधारा, पोटोबा महाराज दिंडी पथक, टाळकरी ग्रुप, मल्लखांब प्रात्यक्षिके, शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, ढोल पथक, आगीचे मर्दानी खेळ, रांगोळी पायघड्या, नंदीबैल, नगारा, गोंधळी, पोतराज, वासुदेव, कोळीगीत, लावण्यवती, अशा विविध कलांचे सादरीकरण होणार आहे. राम लक्ष्मण सीता यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोरया प्रतिष्ठाच्या वतीने अबोली ढोरे यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– सावधान, तो परत येतोय! महाराष्ट्रात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय, मुंबई-पुणे भागात परिस्थिती चिंताजनक
– मावळ तालुक्यात हे काय सुरु आहे? प्रेम प्रकरणावरून एकाला घरात घुसून मारहाण आणि…