मौजे शिळींब गाव , ( Shilimb Village ) मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील एक मोठ्ठं गाव. राजकारण, सहकार, कृषी, सांस्कृतिक क्षेत्रात गावचा तसा तालुक्यात चांगलाच दबदबा आहे. परंतू गावात मुलभूत सोईसुविधा, पायाभूत सुविधा ( Infrastructure ) यांची हवीतशी उपलब्धी नसल्याची तक्रार येथील तरुणांची आहे. याबाबत ग्रामपंचायतीशी ( Shilimb Gram Panchayat ) संपर्क करावा असे विचारले असता, ‘गावात दोन वर्षे गाव जमा झालेली ग्रामसभा ( Gram Sabha ) भरली नाही की सरपंच, ग्रामसेवक विचारावं तर जागेवरच नाहीत’ अशी थेट तक्रारच काही युवकांनी केली. त्यामुळेच आता आम्ही सर्वांनी एकत्र येत ‘एक दिवस गावासाठी, श्रमदानातून विकासासाठी’ ( One Day For Village ) हा उपक्रम राबवत काही विकासात्मक उपाययोजना करणार असल्याचे तरुणांनी सांगितले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
उपक्रमाची सुरुवात थेट स्मशानभूमीपासून…
या सर्व तरुणांनी श्रमदानाचा ( Development Through Labor Donation ) निर्धार केला. पण गावात तर समस्यांचे अनेक डोंगर आहेत. अशावेळी श्रमदानाची सुरुवात कुठून करावी, याचा विचार करता सर्वांनी गावातील स्मशानभूमीपासून उपक्रमाची सुरुवात करायचे ठरवले. त्यानुसार आज (सोमवार, 26 सप्टेंबर) रोजी गावातील स्मशानभूमीभोवती वाढलेले गवत, झुडपे यांची साफसफाई करुन, तिथे तणनाशकांची फवारणी करुन तो भाग स्वच्छ करण्यास सुरुवात केली. याच ठिकाणी आता जागा स्वच्छ झाल्यानंतर वृक्षारोपण आणि सुशोभिकरण करणार असल्याचे तरुणांनी सांगितले.
सागर केदारी, गणेश शिंदे, शुभम दरेकर, अर्जून दरेकर, शंकर दरेकर, ऋषिकेश शिंदे, संतोष बिडकर, नितिन केदारी, रोहित केदारी, शिवाजी कुंभार, शेखर जगताप, प्रणील ठमाले या तरुणांनी आज गावात श्रमदानातून विकासाकडे पाऊल टाकले. त्यांच्या या कृतीचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे. ( One Day For Village Development Through Labor Donation Maval Taluka Shilimb Village Special Mission )
अधिक वाचा –
मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र
Video : शेतकऱ्याचा नादखुळा; फायबरच्या का असेना पण बैलांची जंगी मिरवणूक काढलीच! लेझीम, हलगी सर्वकाही
Video: शिळींब गावातील शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता वाहून गेला, नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास