लोणावळा शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील बाजारपेठ भागातील वाहतूक कोंडीवर मार्ग म्हणून एकेरी वाहतुकीचा पर्याय अंतिम करण्यात आला आहे. गुरुवारपासून (दि. 27 जून) हा निर्णय लागू करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वाहतूक पोलिसांकडून दिनांक 14 जून ते 21 जून या कालावधीसाठी बाजारपेठेत प्रायोगिक तत्त्वावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता गुरुवारपासून या निर्णयाची कायमस्वरूपी अंमलबजावणी होणार आहे. बाजारपेठेतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. असे असले तरीही शहरातील मध्यावर्ती भागातील जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी ही कायमच डोकेदुखी राहणार आहे. ( One way transport option in Lonavala city market area )
असा असेल एकेरी मार्ग –
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पूल, हुडको मार्गाने रानडे हॉस्पिटल आणि पोलिस ठाण्यासमोरून पुन्हा श्री छत्रपती महाराज चौक असा एकेरी वाहतुकीचा मार्ग राहणार आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘रयत’ घालतेय साद । Maval News
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय ! पुणे रिंग रोड बाबत महत्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना होणार ‘धनलाभ’, वाचा सविस्तर