अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येते. तसेच संबंधित प्रवर्गातील व्यक्तींना निवडणूकीसाठी अथवा शासकीय नोकरीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जाची प्रक्रिया ही आता 01 ऑगस्ट 2020 पासून ऑनलाईन झाली आहे. या लेखात आपण जात वैधता प्रमाणपत्राकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते सविस्तर जाणून घेणार आहोत. जात वैधता प्रमाणपत्र राखीव जागांसाठी परंतू शिक्षण, निवडणूक, सेवा कारणांसाठीच घेता येते. ( Online Form Filling For Caste Validity Certificate Know Process and Required document )
जात वैधता प्रमाणपत्र कशासाठी लागते?
जात वैधता प्रमाणपत्र तीन कारणासाठीच काढता येते.
विद्यार्थी/शिक्षण – शाळकरी विद्यार्थ्यांना 12 वी नंतर महाविद्यालयात अॅडमिशन घेण्यासाठी किंवा महाविद्यालयात स्कॉलरशिप मिळण्यासाठी.
नोकरी/शासकीय नोकरी – सरकारी नोकरी मिळत असताना आरक्षित जागेचा लाभ घ्यायचा असल्यास.
उमेदवारी/निवडणूक – निवडणुकीत राखीव जागेवर उभे राहणाऱ्या उमेदवाराला राखीव जागेचा उमेदवार असल्यास जात वैधता प्रमाणपत्र द्यावे लागते.
म्हणूनच सदर प्रवर्गातील व्यक्तींनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आता जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच ही अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन झाली आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
जात वैधता प्रमाणपत्र हे महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. फक्त काही राज्य सरकार जात प्रमाणपत्र अर्ज प्रक्रिया ऑफर करतात जी केवळ ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते. प्रमाणपत्रासाठी नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे आणि सहाय्यक कागदपत्रांच्या सर्व आवश्यक मूळ किंवा प्रमाणित प्रती अर्जासोबत असणे आवश्यक आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट : https://bartievalidity.maharashtra.gov.in/index.php
‘जात वैधता प्रमाणपत्र’
महा ई सेवा केंद्र / एजंट कडे जाऊन हजारो रुपये देण्याचे दिवस संपलेत त्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध.
ऑनलाईन अर्जासहीत शुल्कही ऑनलाईन भरा.
दिलेल्या तारखेला जात पडताळणी समितीसमोर मूळ कागदपत्रांसहित हजर व्हा.
जात पडताळणी होऊन जाईल.https://t.co/75NImVTkXd
— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 22, 2023
विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र हवे असल्यास लागणारी कागपत्रे;
– संबंधित कॉलेजचे पत्र व चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड
– अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्यांची स्वाक्षरी, शिक्का शिवाय अर्जदाराचा फोटो
– अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गम उतारा
– अर्जदाराचा जातीचा दाखला झेरॉक्स प्रत
– अर्जदार वडिलांचा शाळेचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला, वडील अशिक्षित असल्यास तसे शपथपत्र
– अर्जदाराची आत्या, चुलत्याचा शाळा सोडल्याचा दाखला
– अर्जदाराचे आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला
– इतर महसुली पुरावे (गाव न. सात, टॅक्स पावती, खरेदीखत, सहा-ड, फेरफार उतारा, गहाणखत, मालमत्तापत्रक)
– वंशावळ नमुना नं. तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व फॉर्म नं. १७ (शपथपत्र).
सर्वांत महत्वाच्या गोष्टी…
– ‘एससी’ संवर्गातील विद्यार्थ्याने जात वैधता प्रमाणपत्रासाठी 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा पुरावा जोडणे आवश्यक आहे.
– ‘व्हीजेएनटी’तील विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 21 नोव्हेंबर 1961 पूर्वीचे पुरावे जोडावेत
– ‘ओबीसी’ व ‘एसबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचे पुरावे देणे बंधनकारक आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे
– तुम्हाला खालील कागदपत्रे ऑनलाइन आणि ऑफलाइन फॉर्ममध्ये जोडणे आवश्यक आहे.
– आयडी व्हेरिफिकेशन
– आधार कार्ड
– पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड आणि मनरेगा कार्ड
– अॅड्रेस प्रूफ
– वोटर आयडी
– ड्रायव्हिंग लायसन्स
– पासपोर्ट
– इलेक्ट्रिक बिल
– फोन आणि पाण्याचे बिल
– भाड्याची पावती
– रेशन कार्ड
– कास्ट सर्टिफिकेट
– अर्जदाराच्या, त्यांच्या वडिलांच्या किंवा नातेवाईकाच्या जन्माच्या दाखल्याचा रेकॉर्ड
– स्वतःच्या किंवा रक्ताच्या नातेवाईकाच्या जातीचा पुरावा
– अर्जदाराच्या वडिलांच्या किंवा अन्य नातेवाईकाच्या सरकारी सेवा रेकॉर्डमधील जात किंवा समुदायाचा उल्लेख असलेला उतारा.
– अर्जदाराच्या प्राथमिक शाळेतील नोंदी, त्यांच्या वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या नोंदींमधून काढा.
– स्थानिक पंचायत किंवा उत्पन्नाच्या नोंदींची एक प्रत.
– जात अधिसूचनेच्या तारखेपूर्वी जात आणि नेहमीच्या निवासस्थानासंबंधी कागदोपत्री पुरावा.
अधिक वाचा –
– पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता मिळाला नाही? ‘या’ नंबरवर लगेच करा फोन । PM Kisan Samman Nidhi
– निबंध स्पर्धेत 6 शाळांमधून प्रगती विद्यामंदिर शाळेतील मंगेश राठोडचा प्रथम क्रमांक, इनरव्हील क्लबचा उपक्रम
– ‘शिवाजीनगरपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचं स्वागत, पण सरकार लोकल्ससाठी स्वतंत्र मार्गिकेचा विचार का करत नाही?’