व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, April 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला जाधववाडी धरण परिसराच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विरोध; तहसीलदारांना निवेदन

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यास धरणाच्या पंचक्रोशीतील गावांनी विरोध केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 1, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Jadhavwadi-Dam

Photo Courtesy : Dainik Maval


जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यास धरणाच्या पंचक्रोशीतील गावांनी विरोध केला असून, ही योजना बंद न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ( Opposition to Charholi water supply scheme from Jadhavwadi Dam area letter to Tehsildar )

सुदुंबरे गावचे माजी सरपंच माणिक गाडे, रामदास गाडे, बाळासाहेब गाडे, नवलाख उंब्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रेय पडवळ, नवनाथ पडवळ, बापूसाहेब दरेकर, बापूसाहेब बोरकर, बाळा आंबोरे, विनायक गाडे, रमेश कराळे, बाळासाहेब जाधव आदी पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

काय म्हटलंय निवेदनात?

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत चऱ्होली पाणीपुरवठा योजनेचे काम चालू आहे. या पाणीपुरवठा योजनेसाठी जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यात येणार आहे. त्यास पंचक्रोशीतील गावांचा तीव्र विरोध आहे. कारण या योजनेमुळे जाधववाडी धरणातील पाणीसाठा कमी होणार असून, पंचक्रोशीतील शेतकरी व रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. या धरणातून सध्या नवलाख उंब्रे, बधलवाडी, जाधववाडी, मिंडेवाडी, इंदोरी या सर्व गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उचलले जात आहे. त्याचप्रमाणे धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर सुदुंबरे, सुदवडी, शिंदे वासोली, येलवाडी, जांबवडे त्याचप्रमाणे भंडारा डोंगर देवस्थान, वारकरी व देहू यात्रा (देहू बीज) अवलंबून असते.

सद्यःस्थितीतच उन्हाळ्यात या सर्व गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचप्रमाणे भविष्यातील विचार करता या भागात वाढती एमआयडीसी व त्या अनुषंगाने वाढते शहरीकरण लक्षात घेता या भागातील गावांना अजून पाण्याची गरज आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे या गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर असून त्यांचे कामही चालू आहे. त्यामुळेही धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे. उन्हाळ्यात या धरणातील पाणीसाठा मृत साठ्यापर्यंत जात आहे. ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच पंचक्रोशीतील रहिवासी व शेतकऱ्यांचा चऱ्होली पाणीपुरवठा योजनेला जाधववाडी धरणातून पाणी उचलण्यास तीव्र विरोध आहे. ही योजना तत्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– भाजपाची बूथ सशक्तीकरणासाठी देहूरोड इथे बैठक; मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे मार्गदर्शन
– खासदार श्रीरंग बारणे यांची निर्दोष मुक्तता! अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात 10 वर्षापूर्वी पुकारले होते आंदोलन
– लई भारी! संपूर्ण पुणे जिल्ह्यात लोकसहभागातून 1200 वनराई बंधारे पूर्ण


Previous Post

लायन्स पॉईंट इथे दरीत कोसळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला । Lonavala News

Next Post

स्पर्धा परीक्षांमधून पोलिस दलात विविध पदांवर नियुक्त झालेल्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांचा सत्कार

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PSI-in-MPSC

स्पर्धा परीक्षांमधून पोलिस दलात विविध पदांवर नियुक्त झालेल्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार ; ‘पीएमआरडीए’कडून 67 कोटींचा विकास आराखडा जाहीर

April 9, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता दिनांक ३१ मे २०२६ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

April 9, 2026
Important news District Collector orders changes to traffic on major roads in Maval for cycle competition

जगाच्या नकाशावर गेलेली पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचा दुसरा हंगाम ; मावळमधील ‘या’ भागात होणार सायकल स्पर्धा

April 9, 2026
Chandrashekhar-Bawankule

उत्खनन रॉयल्टी माफ, बिगरशेती परवाना प्रक्रिया डिजिटल होणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

April 9, 2026
MPSC

एमपीएससी मुख्य परीक्षा – २०२४ चा निकाल जाहीर ! सोलापूर जिल्ह्यातील विजय लामकाने राज्यात प्रथम

April 9, 2026
Massive fire breaks out at scrap warehouse along old Pune-Mumbai highway in Kamshet Maval

कामशेत येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामाला भीषण आग ; लाखोंचा माल भस्मसात

April 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.