महाराष्ट्र राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज रविवार, दिनांक 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर लाखो श्रीसदस्यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा सर्वोच्च नागरी सन्मान 27 वा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच संपूर्ण जभरातील लाखो-करोडो श्रीसदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळ्याची तयारी मागील अनेक दिवसांपासून खारघर येथे सुरु होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व गोष्टींवर लक्ष ठेऊन होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला होता. त्यामुळेच रविवारी न भूतो न भविष्यती असा हा सोहळा पार पडला. ( padma shri dr dattatreya appasaheb dharmadhikari awarded maharashtra bhushan 2022 by union home minister amit shah kharghar navi mumbai )
ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन २०२२ चा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री @AmitShah यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. pic.twitter.com/5sGQAEcj4E
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 16, 2023
महाराष्ट्र भूषण स्व. डॉ नारायण उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांचे पुत्र असलेले दत्तात्रेय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अध्यात्म आणि सामाजिक सेवेचा त्यांचा वारसा अत्यंत समर्थपणे चालवला आहे. त्यांच्या पत्नी स्व. अनिता धर्माधिकारी यांची त्यांना यात मोलाची साथ लाभली. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ सचिन दादा धर्माधिकारी हे देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवेचा आणि अध्यात्मविद्येचा वारसा चालवत आहेत. स्व. डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनाही मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर आता आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वी मिळालेले पुरस्कार
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यापूर्वीच देशाचा चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने 2017 मध्ये सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2014 मध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. यासह युरोपियन विद्यापीठाच्या वतीने ‘द लिव्हिंग लेजंड’ पुरस्कार देऊनही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
अधिक वाचा –
– ‘मावळ मतदारसंघातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, लोणावळ्यातील रेल्वे कामांना गती’ – खासदार श्रीरंग बारणे
– “निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पुलवामा हल्ल्यातील 40 जवानांच्या बलिदानाचे भांडवल केले का?”