चैतन्य इंटरनॅशनल स्कूल (CBSE) इंदोरी येथे दिनांक 9 डिसेंबर रोजी कार्तिकवारी निमित्त पालखी चे आयोजन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा हे औचित्य साधून शाळेत या वारीचे आयोजन करण्यात आले. सकाळी प्रार्थना सभेत संस्थेचे संस्थापक भगवान शेवकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी त्यांनी वारीची परंपरा, प्रसार कार्य ,महत्व व संत माहात्म्य या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सर्व विद्यार्थी व अध्यापकवृंद यांनी पारंपारिक वेशभूषा धारण केली होती. विठ्ठल- रुक्मिणी, संत जनाबाई, संत नामदेव ,भक्त पुंडलिक संत तुकाराम, पंढरीचा वारकरी यांची प्रातिनिधिक रूपे विद्यार्थ्यांनी साकारली होती. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं. हरिनामाच्या गजरात विद्यार्थी तल्लीन झाले होते .वैष्णवांचा गजर, टाळ, व मृदुंगाने वातावरण दुमदुमले होते. पालखी घेऊन वेशभूषा केलेल्या वारकऱ्यांनी विद्यालयातून पालखी ची मिरवणूक काढली.
“भेटी लागे जीवा लागलीसे आस……. ही अनुभूती सर्वांनी अनुभवली. सगळे वातावरण भक्तिमय व विठ्ठलमय झाले होते. शेवटी पांडुरंगाची आरती व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. ( Palkhi ceremony on occasion of Kartiki Ekadashi at Chaitanya International School Maval )
अधिक वाचा –
– गतिरोधकावरुन दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू
– मावळ तालुक्यातील वन विभागाच्या हद्दीतील कामांना गती देण्याचे उपवनसंरक्षक यांचे आश्वासन
– भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा शिबीर संपन्न