मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील मौजे शिळींब ( Shililmb Village ) ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गावातील ग्रामस्थ, तरुणांनी यापूर्वीही ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याची, माहिती देत नसल्याची तक्रार अनेकदा केली होती. त्यानंतर आता थेट ग्रामपंचायत सदस्य लिलाधर धनवे यांनीच ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याचे म्हणत त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. लिलाधर धनवे यांनी दैनिक मावळशी संवाद साधताना याबद्दल भाष्य केले आहे. ( Pavan Maval Shilimb Village Gram Panchayat Member Alleges Against Gram Sevak )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे ग्राम सदस्याची तक्रार?
ग्रामपंचायत सदस्य लिलाधर धनवे यांनी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संतोष बोंद्रे यांच्यावर काही आरोप केले आहेत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून मागितलेली माहिती देखील देण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामसभा, मासिक सभेचे लिहिलेले प्रोसिडिंग मागितले असता, आज महिने गेले तरीही त्यांनी ते अद्याप दिले नसल्याचे धनवे यांनी म्हटले आहे. तसेच, ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याची शंकाही ग्रामसदस्य लिलाधर धनवे यांनी ग्रामसेवक संतोष बोंद्रे यांच्याबद्दल बोलून दाखवली.
ग्रामस्थांचाही समान सूर…
ग्रामसेवक संतोष बोंद्रे हे गावातील नागरिकांना आवश्यक ती माहिती देत नाहीत, सहकार्य करत नाहीत, अशी तक्रार स्वतः लिलाधर धनवे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ आणि तरुणांनी केली आहे. इतकेच नाही तर मावळ तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिळींब ग्रामपंचायतचा कारभार आणि गावचा विकास अशा बेशिस्त आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे खुंटला असल्याचेही दिसत आहे. हे सर्व समजून घ्यायला मागील कित्येक महिने गावात ग्रामसभाही झालेली नाही, असे काही नागरिकांनी दैनिक मावळ सोबत बोलताना सांगितले.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! शिळींब गावात महिन्याभरात दुसरी मोठी चोरी, लाखोंचा माल लंपास, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण I Video
– पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन
– शिळींब ग्रामपंचायतीला गांधी जयंतीचा विसर; गावातील तरुणांनी बंद कार्यालयासमोर साजरी केली गांधी जयंती, तालुक्यात होतेय चर्चा