देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) वाढवलेली 2 हजार यार्डांपर्यंतची हद्द कमी करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या सदस्यांनी स्थानिक लोकांचा कोणताही विचार न करता वेगवेगळी मते दिली आहेत. त्यानुसार 2 हजार यार्डांपर्यंतची हद्द कायम करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. ( Pimpri Chinchwad Repeal Proposed Decision To Limit Redzone To 2000 Yards Immediately MP Shrirang Barne )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
2 हजार यार्डांपर्यंत हद्द केल्यास निम्मे पिंपरी-चिंचवड शहर ‘रेडझोन’ बाधित होईल. त्यामुळे 2 हजार यार्ड ‘रेडझोन’ची हद्द कायम करण्याचा प्रस्तावित निर्णय तत्काळ रद्द करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य सरकार यांची एकत्रित बैठक घ्यावी. चर्चा करुनच पुढील कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
‘मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड दारूगोळा कारखान्यात संरक्षण विभागासाठी 1982 पासून पायरो टेक्नोलॉजी, जैसे 16 एमएम, 155 एमएम की स्मोग आणि सैनिकांसाठीची महत्वाची यंत्रसामग्री, सिग्नलिंग यंत्रे निर्माण केली जातात. या कारखान्यात अति स्फोटके निर्माण केली जात नाहीत. या भागाला जोडून संरक्षण विभागाच्याच इमारतींसह तेथील अधिकाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालय, शाळा, रुग्णालये, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाचे कार्यालय, पिंपरी-चिंचवड महापालिका, तळवडे आयटी पार्क, पीएमआरडीएचे क्षेत्र आहे.’
हेही वाचा – ‘लोकांची भावना सोडून राष्ट्रवादीसोबत काम करावे लागले, पण हे कुणालाही मान्य नव्हते’ – खासदार श्रीरंग बारणे
सदर भागात सुमारे 5 ते 6 लाख लोकांचे वास्तव्य असून महापालिका, पीएमआरडीए, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने अनेक गृहप्रकल्पांना मान्यता दिली आहे. अनेक वर्षांपासून या भागात मोठ-मोठ्या इमारती असून लोकांचे वास्तव्य आहे. या भागात रस्ते, पाणी, वीज या सुविधा दिल्या आहेत. संपूर्ण भाग संरक्षण विभागाचाही नाही, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.
अधिक वाचा –
– मविआच्या महामोर्चात आमदार सुनिल शेळकेंचा सहभाग, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी – व्हिडिओ
– माऊ गावाजवळ दुचाकीचा अपघात, वीटभट्टीवरील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर कोसळलं दुःखाचं आभाळ
– श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर अँड ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न