विजय शिवतारे हे जर बारामती लोकसभा मतदारसंघात युती धर्म पाळणार नसतील तर आम्हीही मावळ लोकसभा मतदारसंघात उद्रेक करु, असा थेट इशारा पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला आहे. अण्णा बनसोडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे विधान केले. तीन दशकांपासून पवार घराण्याचे बारामतीवरील वर्चस्व संपवण्याचा विडा उचलल्याचे विजय शिवतारे म्हणतात. त्याबाबत बोलताना प्रत्युत्तर म्हणून अजितदादांचे आमदार अण्णा बनसोडे यांनी हा इशारा दिला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
अण्णा बनसोडे म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत विजय शिवतारे जे वक्तव्य करत आहेत, ते अत्यंत चुकीचे आहे. महायुती सरकारमध्ये काम करत असताना अशा प्रकारची भूमिका घेणे हे योग्य गोष्ट नाही. जर शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघात विरोधात काम करत असतील, तर त्याचा उद्रेक हा महाराष्ट्रभर होईल, आणि याचे परिणाम मावळ मतदारसंघातही पाहायला मिळतील, असा थेट इशारा आमदार अण्णा बनसोडे यांनी दिला. ( Pimpri Vidhan Sabha MLA Anna Bansode criticizes Vijay Shivtare Maval Lok Sabha Constituency )
..तर शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार –
बारामतीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे महायुतीचा धर्म पाळत नसल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. शिवतारे यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्हीही पाळणार नाही. पार्थ पवार यांचा मागील वेळी झालेल्या पराभवाचा या घडामोडीशी काहीही संबंध नाही. आता तिन्ही पक्षांची महायुती आहे. तिन्ही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळावा. शिवतारे हे मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळतील असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा –
– महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News
– शिरगाव येथील ‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणकडून 4 लाखांची नुकसानभरपाई, आमदार शेळकेंनी आमसभेत दिले होते आदेश
– निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण । Pune News