इन्स्टाग्राम ( Instagram ) या समाज माध्यमावर पिस्तूलाच्या विक्रीची जाहिरात करणाऱ्या एका सराईताला पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यासोबत त्याच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडू अशोक कालेकर (24, रा. काले कॉलनी, पवनानगर, मावळ), अक्षय उर्फ दादा साहेबराव सुर्वे (24, रा. संकुल सोसायटी, भुगाव, मुळशी), शुभम गणेश खडके (विघ्नहर्ता पार्क सोसायटी, मुळशी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, खंडू अशोक कालेकर हा सराईत गुन्हेगार असून इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे मोठ्या प्रमाणावर फॉलोवर्स आहेत. तो मुळ पवनानगर (ता. मावळ) येथे राहणारा असला तरीही पिंपरी-चिंचवड भागात तो काम करत होता. गुंड विरोधी पथक त्याच्या मागावर होते. तसेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील पोलिसांचे लक्ष होतेच. या दरम्यान गुंड विरोधी पथकाला ( Anti Gangster Squad ) आरोपी खंडू कालेकर याने इंस्टाग्रामवर पिस्तूल विक्रीची जाहिरात प्रसिद्ध केल्याचे आढळले. यात ब्रेटा मॉडेलची एक पिस्तूल आणि त्याखाली 60 हजार रुपये किंमत दाखवण्यात आली होती. ( Pistol Advertising On Social Media Criminal Khandu Kalekar Arrested )
हेही वाचा – अतिवेग नडला, देहूरोड येथे दुचाकीस्वाराचा मृत्यू
त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढायला सुरुवात केली. आरोपी कालेकर याने मध्यप्रदेश येथून 6 गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणली होती. तसेच, कालेकर हा थेरगाव येथील डांगे चौक परिसरात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना मिळाली. त्यानुसार, त्यांनी सापळा रचून 3 आरोपींना ताब्यात घेतले, त्यांच्याकडून 3 देशी बनावटीचे पिस्तूल, 1 मॅक्झिन, 9 जिवंत काडतूसे जप्त केली. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंड विरोधी पथकाने ही कामगिरी केली.
अधिक वाचा –
– ‘हा मंत्री नितीन गडकरी खड्डा… हा खासदार श्रीरंग बारणे खड्डा !’ मावळ तालुक्यातील अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा
– वडगाव रेल्वे स्टेशनवर अनोळखी पुरूषाचा मृतदेह आढळल्याने खळबळ! वर्णनावरुन ओळख पटल्यास संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन