मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठाण करूंज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध देवस्थान श्री बेलेश्वर – करूंज इथे वृक्षारोपण करण्यात आले. करूंज पंचक्रोशीतील श्रीक्षेत्र बेलेश्वर हे देवस्थान परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठान यांनी दिवसभर साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर मंदिराच्या अवती भवतीच्या परिसरात फुलझाडे लावून तो सुशोभित केला. ( plantation of trees at beleshwar devasthan at karunj village of maval taluka )
तसेच पर्यावरणाचे संतुलन राहावे आणि पुढील काळात येणाऱ्या भाविकांना सावली मिळून मंदिर परिसर थंड आणि शांत रहावा म्हणून शेकडो झाडांची लागवडही करण्यात आली. यापुढील काळात येणार्या भाविकांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मावळ तालुका वारकरी मंडळ आणि शंभुराजे प्रतिष्ठान संयुक्तपणे काम करील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
हेही वाचा – मावळ तालुका वारकरी मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका निकम, पाहा संपूर्ण कार्यकारिणी
ह्यावेळी हभप नारायण केंडे, भाऊसाहेब आंभोरे, दिनकरबुवा निंबळे, भाऊ महाराज काटे, गायनाचार्य विलास घारे, सचिन ठाकर, सागर वाळुंज, शाहिदास दहिभाते, उमेश लगड, परशुराम लोखंडे, संतोष जाधव, सहादु दहिभाते, नंदाराम जाधव, संजय घाडगे, गोरख तरस, संजय ढोरे, शिवाजी ढोले, बाजीराव ढोरे, बाळकृष्ण तुपे, विकास ठुले, मयुर दहिभाते, मारुती लोखंडे, मोतीराम दहिभाते, बाळु दहिभाते, मयुर लगड, दुर्वेश काटे, मनोहर निंबळे, छायाताई काकरे, अलका मोरे, सुषमा खानेकर, मालन ढोरे, कमल काकरे, अनुसुया म्हस्के, सखुबाई तिकोणे आणि नागरिक-भाविक उपस्थित होते. ( plantation of trees at beleshwar devasthan at karunj village of maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा नशेखोरांवर कारवाईचा दणका! 11 जणांना खावी लागणार जेलची हवा । Lonavala Crime
– “चंदा मामा अब नहीं दूर, चंदा मामा की बस एक टूर” – पंतप्रधान नरेंद्र मोदी; असं झालं चंद्रावर चंद्रयानाचं लँडिंग, जाणून घ्या
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’