व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 1, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुण्यातील 30 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे’ पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; मावळमधील दोन केंद्रांचा समावेश

या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्यादृष्टीने उपयुक्त कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 20, 2023
in पुणे, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, शहर
Rural-Skill-Development-Centers

Photo Courtesy : Twitter / CMO


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील 30 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांसह राज्यातील 511 केंद्रांचे शुक्रवार (दि. 19 ऑक्टोबर) दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगाराच्यादृष्टीने उपयुक्त कौशल्य विषयक प्रशिक्षण मिळणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

nakshtra ads may 2025

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत पुरंदर तालुक्यातील दिवे ग्रामपंचायत परिसरात शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रांत राजपूत, गट विकास अधिकारी अमिता पवार, नागरिक, दिवे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

tata tiago ads may 2025

  • पुणे जिल्ह्यात इतर ठिकाणीही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र उदघाटन कार्यक्रमाचे दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगार तयार होण्याच्यादृष्टीने युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ( PM Narendra Modi inaugurated 30 Pramod Mahajan Rural Skill Development Centers in Pune district )

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे सहायक सौंदर्य थेरपिस्ट, घोडेगाव येथे शिलाई मशीन ऑपरेटर, शिनोली येथे प्रक्रिया पर्यवेक्षक (रंगकाम व मुद्रणकला), बारामती तालुक्यात बाबुर्डी येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ आणि गुणवडी येथे वेब डेव्हलपर, भोर तालुक्यात भोलावडे येथे सुरक्षा रक्षक व वेलु येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी या विषयांचे कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दौंड तालुक्यात यवत येथे पथ खाद्य विक्रेता, पाटस येथे सहायक वीजतंत्री आणि केडगाव येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी, हवेली तालुक्यात उरळीकांचन येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ, लोणीकाळभोर येथे गृहस्वच्छता-स्वयंपाकी आणि कदमवाकवस्ती येथे वीजतंत्री- घरगुती साधने, इंदापूर तालुक्यात कळंब वालचंदनगर येथे मल्टिस्किल इलेक्ट्रिकल तंत्रज्ञ आणि निमगाव केतकी येथे सुरक्षा रक्षकविषयक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जुन्नर तालुक्यात नारायणगाव येथे वैद्यकीय अभिलेख सहायक, ओतुर येथे मोबाईल हार्डवेअर दुरुस्ती तंत्रज्ञ आणि आळेफाटा येथे अकाउंट्स एक्झिक्युटीव्ह, खेड तालुक्यात नानेकरवाडी येथे सीएनसी ऑपरेटर- टर्निंग आणि मेदनकरवाडी येथे फिटर- फॅब्रिकेशन, मावळ तालुक्यात कुसगाव बु. येथे ग्राफिक डिझायनर आणि खडकळा येथे ॲनिमेटर, मुळशी तालुक्यात पिरंगुट येथे मल्टिस्किल टेक्निशयन आणि माण येथे फील्ड टेक्निशियन- संगणक व साधने या विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

अधिक वाचा –
– ‘राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी’, उद्योगमंत्र्यांनी जनरल मोटर्सच्या कामगारांना नेमके काय आश्वासन दिले? वाचा सविस्तर
– आमदार सुनिल शेळकेंचा वाढदिवस यंदा साधेपणाने साजरा होणार; ‘नागरिकांनी भेटीसाठी येऊ नये’, आमदारांचे आवाहन
– महिला आर्थिक सक्षमीकरण आणि ग्राम उद्धार कार्यक्रमांतर्गत शिळींब गावातील महिलांना शेवई बनवण्याचे यंत्र वाटप


dainik maval ads may 2025

Previous Post

आमदार सुनिल शेळकेंची क्रेझच निराळी! गिर्यारोहकांनी वजीर सुळक्यावर फडकवला वाढदिवसाचा बॅनर । MLA Sunil Shelke Birthday

Next Post

‘अभिवादन नवदुर्गांना’ । तिच्याच ‘लेखणीनं’ सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Poet-Kalpana-Dudal

'अभिवादन नवदुर्गांना' । तिच्याच 'लेखणीनं' सोडवली तिची चौकटीतील घुसमट; कवयित्री कल्पना दुधाळ यांचा वाखण्याजोगा लेखनप्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drunk driver runs over MPSC students in Pune twelve injured CM Fadanvis takes note

मोठी बातमी : पुण्यात मद्यपी वाहन चालकाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना उडवले, बारा जण जखमी, मुख्यमंत्र्यांकडून दखल । Pune News

May 31, 2025
Accident

ताजे गावाजवळ भीषण अपघात ! पिकअपचे पंक्चर काढत असलेल्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू

May 31, 2025
MLA Sunil Shelke take review meeting at Lonavala Municipal Council Anger on officials

नागरिकांना वेळ द्या, त्यांचे प्रश्न सोडवा ; लोणावळ्यातील आढावा बैठकीत आमदार शेळके यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी । Lonavala News

May 31, 2025
Seventeen year old boy drowned in Valvan dam Lonavala

मित्रांसोबत फिरायला आलेल्या सतरा वर्षीय निलेशचा वलवण धरणात बुडून मृत्यू । Lonavala News

May 31, 2025
Former students of Pavana Vidya Mandir came together again after 27 years valuable help to school

पवना विद्या मंदिरचे माजी विद्यार्थी २७ वर्षांनी पुन्हा आले एकत्र ; शाळेला केली मोलाची मदत । Pavananagar News

May 31, 2025
Balasaheb Masurkar elected as president of Kothurne Society Pavan Maval

कोथुर्णे कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब मसुरकर यांची निवड । Pavan Maval

May 31, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.