सध्या लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. देशात तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी एनडीएची जोरदार तयारी सुरु आहे. त्यामुळेच रात्रीचा दिवस करत नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी देशभर सभा, बैठका, रॅली करत आहेत. पुणे जिल्ह्यात असणाऱ्या 4 लोकसभा मतदारसंघांसाठी पंतप्रधान मोदी यांची पुण्यात दिनांक 29 एप्रिल रोजी सभा होणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 आणि 30 एप्रिल रोजी महाराष्ट्रात सभा होणार आहे. नरेंद्र मोदींच्या 29 आणि 30 एप्रिल रोजी नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 27 एप्रिल रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 30 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पुणे शहर परिसरात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन इत्यादी प्रकारच्या अवकाश उड्डाणावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.
सदर आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 च्या दंडनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ( PM Narendra Modi will come to Pune ban on paragliding drone flying for 3 days for security reasons )
अधिक वाचा –
– तळेगावात पोलिसांकडून भल्या पहाटेच कोम्बिंग ऑपरेशन, 40 गुन्हेगारांची झाडाझडती, काय असतं कोम्बिंग ऑपरेशन? वाचा । Talegaon Dabhade
– मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग बसचा थरार – Video
– पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याचे आवाहन । Pune News