पूर्ववैमनस्यातून एकाचा खून करण्यात आल्याची घटना 1 जुलै रोजी खालुंब्रे गावाच्या (ता. खेड) हद्दीत घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. खून केल्यानंतर हे आरोपी मावळ तालुक्यातील जांबवडे गावात लपून बसले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गणेश अनिल तुळवे (वय 30, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाचा प्रणय प्रदिप ओव्हाळ (वय 21, रा. कान्हे फाटा, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मयूर अशोक पवार (वय 30, रा. तळेगाव दाभाडे), विशाल पांडुरंग तुळवे (वय 37), रणजीत बाळू ओव्हाळ (वय 22), प्रथम सुरेश दिवे (वय 21), विकास पांडुरंग तुळवे (वय 35), सनी रामदास तुळवे (वय 26), चंद्रकांत भीमराव तुळवे (वय 38, सर्व रा. खालुंब्रे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ( police arrested accused who were hiding in jambawade village of Maval after killing one person in khalumbre )
फिर्यादी प्रणय आणि त्यांचा मामा गणेश हे सोमवारी सांयकाळी सात वाजताच्या सुमारास दुचाकीवरून चालले होते. ते तळेगाव चाकण रस्त्यावरील खालुंब्रे गावच्या हद्दीत हैद्राबादी बिर्याणी हाऊससमोर आले असता दोन आरोपी दुचाकीवरून आले. त्यांनी गणेश यांच्यावर कोयत्याने वार केले. फियादी प्रणय हे सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांच्यावरही वार केले. यामध्ये गणेश यांचा मृत्यू झाला.
आरोपींच्या तावडीतून मामाला सोडविण्यासाठी फिर्यादी प्रणय गेले असता आरोपींनी त्यांच्यावरही कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात प्रणय हे गंभीर जखमी झाले. खून झाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी 48 तासात आरोपींचा शोध घेऊन सात जणांना अटक केली. खून केल्यानंतर आरोपी मावळ तालुक्यात लपून बसले होते. त्यांचा ठावठिकाणा शोधून जांबवडे गावातून त्यांना अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार तानाजी गाडे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, संतोष काळे, गणेश गायकवाड, शिवाजी लोखंडे, अमोल बोराटे, संतोष वायकर, राजेंद्र खेडकर यांनी केली.
अधिक वाचा –
– महत्वाचे ! ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेतील काही अटी बदलल्या, अनेक कागदपत्रांसाठी पर्याय उपलब्ध, जाणून घ्या
– ‘भारत हा क्रिकेटचा विश्वगुरू असल्याचे संघाने सिद्ध केले’ – मुख्यमंत्री शिंदे ; महाराष्ट्र सरकारकडून विश्वविजेत्या संघाला 11 कोटींचे बक्षीस
– मावळात आपत्ती व्यवस्थापनात मोलाचे कार्य करणाऱ्या ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेला मोठी मदत । Talegaon Dabhade