व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं! ‘अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु’, अनंता कुडेंची बोचरी टीका

वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं; 'अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु', अनंता कुडेंची बोचरी टीका

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 19, 2022
in लोकल, मावळकट्टा, शहर
Jambhul-Dam-Maval-Taluka

Photo Courtesy : Ananta Kude


“वडगाव मावळ शहराची वाढती लोकसंख्या आणि विस्तार विचारात घेऊन शहरातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध होईल या हेतूने भाजपा पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून सन 2018 साली वडगाव ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले. भाजपा आणि राष्ट्रवादी तसेच भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत होऊन, तरुण होतकरू चेहरा पाहून पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत वडगावकरांनी सर्वाधिक मते मयूर ढोरे यांच्या पारड्यात टाकून त्यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. परंतू मागील साडेचार वर्षांत नगराध्यक्ष यांनी राज्यातील बदलत्या राजकीय परीस्थितीनुसार वेळोवेळी रंग बदलून नगरपंचायतीत मनमानी कारभाराला प्राधान्य दिले आणि वडगावकर नागरिकांचा सपशेल अपेक्षाभंग केला आहे,” असा घणाघात वडगाव शहर भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी केला आहे. ( Politics Between BJP And NCP On Vadgaon Maval City Water Supply Scheme )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

“वडगाव शहरातील विकासकामे मार्गी लावण्याबाबत मविआ सरकार काळात आलेले अपयश झाकण्यासाठी आता भाजपा-शिवसेना युती सरकारने मंजुरी दिलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न वडगावचे नगराध्यक्ष आणि तालुक्याचे आमदार दोघांकडून केला जात आहे. परंतू विकासकामे केल्याचा कितीही आव आणला तरी वडगावकर जनता सुज्ञ आहे. पुढील सहा-सात महिन्यांतच नगरपंचायत निवडणुकीच्या निकालातून याची प्रचिती येईल. सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढून फसवण्याचे धंदे नगराध्यक्ष आणि आमदार यांनी बंद करावेत,” असा टोलाही भाजपा शहराध्यक्ष कुडेंनी लगावला आहे.

“वडगाव नगरपंचायतीसाठी 40 कोटींची पाणी योजना माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतूनच मंजूर झाली आहे, हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करू”, असे गटनेते दिनेश ढोरे सांगितले.

हेही वाचा – वडगाव शहरातील ‘या’ भागाला मिळाली नवी ओळख, पाहा जागेचे नवीन नामकरण काय? I Vadgaon Maval

“वडगावमधील विकासासाठी भाजपाचे अध्यक्ष अनंता कुडे तसेच सर्व नगरसेवक यांनी माजी मंत्री बाळा भेगडे यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर बाळा भेगडे यांनी स्वतः पाठपुरावा करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनांक 2 नोव्हेंबर 2022 रोजी भेट घेऊन तालुक्यातील विविध विकास कामांची मागणी केली होती. यामधील वडगाव शहरातील पाणी योजनेसाठी 40 कोटी निधीची मागणी केली असता, वडगाव शहरातील पाणी योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. लवकर त्या कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करणार आहे”, अशी माहिती अनंता कुडे यांनी दिली.

हेही वाचा – तुमच्याकडेही भाडेकरू आहेत का? 7 दिवसांत लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे माहिती सादर करा, अन्यथा…

तसेच, “जांभूळ येथे इंद्रायणी नदीवर 15 जवळ जॅकवॉल बांधून हे पाणी लिफ्ट करून 300 मीमी व 2– मीमी व्यासाच्या पाईपलाईन मधून हे पाणी वडगाव नजीकच्या शिंदे टेकडी व संस्कृती येथे फिल्टर प्लांट बसून शहराला स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणारा ही ड्रीम प्लॅनिंग योजना आहे. या पाणी योजनेच्या माध्यमातून वडगाव शहरातील नागरिकांची पाण्याची होणारी गैरसोय कायमस्वरूपी मिटणार आहे”, अशी माहिती विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर यांनी दिली.

अधिक वाचा –

– लोणावळ्यात राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यालाही अभिषेक
– मुंढावरे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ हेलम यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश


Previous Post

मुंढावरे गावचे विद्यमान सरपंच नवनाथ हेलम यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Next Post

सीआरपीएफ जवान आणि आयटी कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान I Kartiki Ekadashi Alandi Wari 2022

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kartiki-Ekadashi-Alandi-Wari-2022

सीआरपीएफ जवान आणि आयटी कर्मचारी दाम्पत्याला मिळाला माऊलींच्या महापूजेचा मान I Kartiki Ekadashi Alandi Wari 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.