पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील अनेक गावांसाठी पवनानगर ( Pavananagar ) हिच प्राथमिक बाजारपेठ आहे. त्यामुळे पवनानगर भागात दररोज हजारो लोक ये-जा करत असतात. पवनानगरमध्ये पवना डॅम भागातून येणाऱ्या नागरिकांसाठी पवनानगर-जवण हाच रस्ता आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यातही बाजारपेठेजवळच असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. ( Potholes Near Pavananagar Market Pavan Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अगोदरच अरुंद असलेल्या या रस्त्यांवरुन मोठ मोठी वाहने ये जा करत असतात. हा रस्ता तसा दोन वाहने जाईल इतका मोठाही नाही, त्यामुळे दोन गाड्या एकाचवेळी जाण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यात रस्त्याच्या दुतर्फा अनेकदा चारचाकी-दुचाकी वाहने पार्क करुन कोंडी केलेली असते. त्यामुळे वाहन चालवणे अधिक कठीण बनते. अशा या खडतर स्थितीत रस्त्यावर असलेले मोठाले खड्डे हा अपघाताला आयतं निमंत्रण देणारा मुद्दा आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हे खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी दैनिक मावळ च्या माध्यमातून नागरिकांनी केली आहे.
अधिक वाचा –
– ठाकुरसाई – गेव्हंडे खडक ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अरविंद रोकडे, 5-3च्या फरकाने मारली बाजी
– भयंकर! कचरा टाकायला गेलेल्या तरुणीवर धारदार शस्त्राने वार, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल
– पवनमावळ भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्षपदी सोमनाथ बोडके यांची निवड