पवन मावळ विभागातील जवण ते तुंग रस्त्यावर जवण क्रमांक 3 येथे असलेला रस्ता काही केल्या होताना दिसत नाही. गेले कित्येक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. पूर्वी जेव्हा हा रस्ता झाला होता, तेव्हा एकपदरी रस्ता होता. कालांतराने हा रस्ता खराब होत गेला, त्यात मोठमोठे खड्डे पडले. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून या मार्गाचे काम सुरु आहे. परंतू हे काम अत्यंत संथगतीने सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातही जवण ते तुंग मार्गावर जवण क्रमांक 3 येथील हा रस्त्याचा भाग काहीकेल्या पूर्ण होताना दिसत नाही, अन् इथेच नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जवणपासून पुढे या रस्त्यावर घारेवस्ती, अजिवली, जाधववाडी, वाघेश्वर, शिळींब, बोडशिळ, डोंगरवाडी, चावसर, मोरवे ते तुंग आदी गाव आहेत. या गावांतील हजारो लोकं आणि शेकडो वाहने दररोज याच रस्त्यावरून ये-जा करत असत असतात. आमदार सुनिल शेळके यांच्या काळात जवण ते तुंग रस्त्यावरील अन्य ठिकाणचे काम झाले आहे. परंतू ऐन घाट रस्ता आणि चढाईचा मार्ग असलेल्या या ठिकाणचा रस्ता मात्र काही केल्या होत नाही. मध्यंतरी हा रस्ता वाढवण्याचे आणि सुधरवण्याचे काम सुरु झाले होते. परंतू काहीकारणाने ते काम होऊ शकले नाही. आता बरोबर दोन पावसाळे झालेत, हा मधला रस्ता खचून तिथे खड्डे पडलेत. तसेच लालमातीचा चिखलही होतो आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. ( Potholes on Javan to Tung road in Pawan Maval area Locals and tourists are suffering )
पवन मावळातील या भागातील शेकडो विद्यार्थी, कामगार, व्यवसायिक, सामान्य नागरिक यांना दररोज कामानिमित्त या मार्गावरून ये-जा करावी लागते. वाहन कोणतेही असो, या ठिकाणाहून पुढे जाताना त्यांचे हालच होत असतात. छोट्या गाड्या, चारचाकी यांच्यासाठी तर हे दिव्यच असते. येथे वाहन खराब होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पूर्ण रस्ता होईल तेव्हा होईल, दोन पदरी रस्ता होईल तेव्हा होईल परंतू किमान एकपदरी तरी रस्ता आणि तोही लवकर पूर्ण करावा आणि दिलासा द्यावा, अशी स्थानिकांची माफक अपेक्षा आहे.
“पिरंगुट येथे दररोज कामावर जात असताना या मार्गावरून जावे लागते. आता पाऊस सुरु होतोय. पहिल्याच पावसात येथे चिखल झाला आहे. चिखल झाल्याने दुचाकी अनेकदा स्लीप होते. एकदा मी स्वतः येथे पडलो होतो. खड्डा आणि चिखल यामुळे गाडी चालवणे अवघड होते. तसेच दुसरा मार्गही आम्हाला नाही. हा रस्ता होणे खूप गरजेचे आहे. अनेकदा नवीन पर्यटक आल्याने येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने गाड्या फसतात. त्यामुळे ट्राफिक देखील होते. त्यामुळे येथे किमान खडी टाकून रस्ता जाण्यायेण्यासाठी सोईचा तरी करावा ही विनंती आहे” – शिवाजी कुंभार (स्थानिक नागरिक)
अधिक वाचा –
– मावळमधील विसापूर गडावरील शिवमंदिराचा आठवा जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात साजरा । Visapur Fort
– जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla
– शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne