Dainik Maval News : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या दिनदर्शिकेचे हभप स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस) व हभप वैराग्यमुर्ती शंकर महाराज मराठे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दरवर्षी प्रमाणे कार्तिकी वारीनिमित्त वारकरी दिंड्यांचे जांभूळ फाटा येथे स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदाय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाने छापलेल्या पाच हजार दिनदर्शिकांचे संपूर्ण तालुक्यात मोफत वितरण केले जाणार आहे.
कार्यक्रमासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप नंदकुमार महाराज भसे यांसह हभप नितीन घोटकुले, माजी सभापती सुवर्णा कुंभार, माजी सरपंच संतोष जांभूळकर, माजी उपसरपंच एकनाथ शेटे, मंडळाचे मार्गदर्शक शिवाजी पवार, मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष कुंभार आदींसह वारकरी व मंडळाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, आळंदी कार्तिकी पायी वारी निमित्त कोकण विभाग व मावळ तालुक्यामधून आळंदीला पायी जाणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांना मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने याहीवर्षी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिंड्यांना शाल श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे शुक्रवार (दि.२२) ते रविवार (दि.२४) रोजी श्री संतकृपा व्यापारी संकुल येथे आयोजन करण्यात आले होते.
राजस्थान वारकरी सांप्रदायाचे प्रदेशाध्यक्ष हभप श्रीमंत रमेशसिंहजी व्यास, हभप स्वामी निरंजनानंद सरस्वती (परमहंस), हभप वैराग्यमुर्ती शंकर महाराज मराठे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट देवून उपक्रमाचे स्वागत केले. तसेच दिंड्यांतील अनेक वारकरी बंधू-भगिनींनी मंडळाच्या कार्याप्रती समाधान व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval