पुणे विधानभवन इथे पुणे जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार सुनिल शेळके यांनी मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. ( Pune District Planning Committee Review Meeting )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
- मावळ तालुक्यातील शाळा सुधारणा कामांसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद व्हावी.
- शाळा सुधारणा करणेसाठी तेथे भौतिक सोयी–सुविधा पुरविण्यासाठी टाईप प्लॅन करणे अत्यावश्यक असून त्या अनुषंगाने सर्व शाळांची सुधारणा करुन शैक्षणिक दर्जा सुधारण्यावर भर द्यावा.
- तालुक्यात आजही अनेक आदिवासी वस्त्या, ठाकरवाड्या आणि कातकरी वस्त्यांवर विज उपलब्ध नाही, अशा ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी.
- त्याचप्रमाणे या आदिवासी / ठाकर / कातकरी वस्त्यांवर विकासकामे करणेसाठी आदिवासी विकास योजनेंतर्गत जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी.
- शासनाकडून अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालय इमारतींना मिळणाऱ्या निधीत सदर इमारतीचे संपूर्ण काम होऊ शकत नाही. सदर कामांना पुन्हा नवीन निधी मिळत नसल्याने बहुतांश बांधकामे अर्धवट अवस्थेत पडून असल्याने सदर इमारतींच्या उर्वरित कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राधान्याने निधीची तरतूद व्हावी
अशा मागण्या आमदार सुनिल शेळके यांनी सदर बैठकीत केल्या.
बैठकीला खासदार शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार, लोकप्रतिनिधी आणि अधिकारीवर्ग उपस्थित होते. ( MLA Sunil Shelke Demand for funds for development works in Maval taluka )
अधिक वाचा –
– पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीची कामे पूर्ण करा – बाळा भेगडे
– आढले खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत भाजपाचे महेंद्र भोईर विजयी! विरोधी उमेदवाराचा ‘इतक्या’ मतांनी पराभव